रणगावमध्ये रंगणार लाल मातीमधील कुस्त्यांचा आखाडा

wrestling championship in rangoan
wrestling championship in rangoan

वालचंदनगर (ता.इंदापूर) - छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवार (ता.२८) रोजी  भव्य लाल मातीतील कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन केले असल्याची माहिती आखाडाप्रमुख रणजित अशोक पवार यांनी दिली. गतवर्षीपासुन संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कुस्त्यांचे आयोजन येथे करण्यात येत आहे. यावर्षी ही सोमवारी सायंकाळी लाल मातीमधील भव्य कुस्ती स्पर्धा होणार आहेत. 

प्रथम क्रंमाकाची कुस्ती कोल्हापूरच्या गंगावेस तालिमचे माऊली जमदाडे व न्यु मोतिबाब तालिमचे नंदु आबदार यांच्याध्ये होणार आहे. द्वितीय क्रंमाकाची कुस्ती योगेश बोंबाळे व संतोष दोरवड यांच्यामध्ये रंगणार आहे. प्रविण राजवडे (लोणावळा) विरुद्ध सचिन पाटील (वारणानगर), निखील कदम विरुद्ध सागर मारकड, कुमार रणमोडे विरुद्ध अशोक देवकाते, अमोल कोळेकर विरुद्ध बाळू सपाटे, माऊली कोकाटे विरुद्ध अक्षय कावरे, नागेश गायकवाड विरुद्ध सिरेश गोफणे यांच्यामध्ये प्रमुख लढती होणार आहेत. आज रविवार (ता.२७) रोजी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी आखाड्याची पाहणी केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय फडतरे, ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र कदम, राजेंद्र महाडिक, शुभम निंबाळकर, तुषार घाडगे, अंबादास लांडगे, कुंडलिक सोनवणे व आखाडा प्रमुख रणजित पवार उपस्थित होते.  

ग्रामीण भागामध्ये लाल मातील कुस्त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी युवकही पुढे येवू लागले असुन युवकांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन आमदार भरणे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com