अबयाचीवाडीतील युवकाचे अपहरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

कऱ्हाड - सव्वासात लाखांच्या खंडणीसाठी अबयाचीवाडी येथील एकाचे अपहरण केल्याची तक्रार येथील तालुका पोलिसात आज दाखल झाली. संजय बळवंत सुर्वे (वय 28) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. ऋषीकेश भंडारी व सागर (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांनी अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी संजय यांची पत्नी सौ. पूनम व बहीण सुलोचना यांना माबोईलवरून सव्वासात लाखांची मागणी केली आहे. ती न दिल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली आहे. सौ. पूनम यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी सांगितले, की संजय यांचा इंदोर येथील पूनम यांच्याशी फेब्रुवारी 2016 मध्ये प्रेमविवाह झाला आहे. संजय शेती करतात. घरी संजय यांची आई, पत्नी व ते असे तिघेच असतात. त्यांना बहीण आहे, तिचा विवाह झाला आहे. आठ मार्चला दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन लोक संजय यांना शोधत घरी आले. त्यावेळी घरात पूनम व संजय दोघेच होते. त्यावेळी संजय यांनी आलेले दोघे माझे मित्र आहेत. त्यांच्यासाठी चहा ठेवण्याचे पत्नी पूनमला सांगितले. त्यावेळी एकाचे नाव ऋषीकेश भंडारी व दुसऱ्याचे सागर असे नाव असल्याचे सांगितले. चहानंतर दोघांनाही बस स्थानकावर सोडून येतो, असे सांगून संजय दुचाकीवरून (एमएच 50 वाय 334) तेथून गेले. बराचवेळ संजय न परतल्याने पूनम यांनी त्यांच्या मोबाईलवर कॉल केला. त्यावेळी त्यांचा मोबाईल बंद लागला. 

दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला संजय यांची बहीण सुलोचना दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी आल्या. त्यांना संजयचे अपहरण झाल्याचा कॉल आल्याची धक्कादायक माहिती सौ. पूनम यांना त्यांनी दिली. सुलोचना यांना आलेल्या कॉलनुसार संजयच्या मोबाईल क्रमांकावरून त्यांना कॉल आला होता. त्यावरून संजयऐवजी दुसरीच व्यक्ती बोलत होती. "तुमचा भाऊ आमच्या ताब्यात आहे. त्यासाठी तुम्ही सात लाख 24 हजारांची जुळणी करा; अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी देऊन त्या व्यक्तीने कॉल कट केला. त्यानंतर पतीचे अपहरण झाल्याची तक्रार पूनम यांनी पोलिसात दिली. 

Web Title: young man's kidnapped