धोंडेवाडीत शाळकरी मुलीच्या मृत्यूनंतर तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

तासगाव - धोंडेवाडी येथील दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचा २५ फेब्रुवारीला विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर गावातीलच तिघांनी ‘या मुलीशी तुझे अनैतिक संबंध होते, असे आम्ही जाहीर करू,’ असे सांगून राहुल रामचंद्र यादव यास ब्लॅकमेल करून दोन लाख रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भीतीने राहुल रामचंद्र यादव (वय २१) या तरुणाने आत्महत्या केल्याचे शुक्रवारी तक्रारीनंतर उघड झाले. 

याप्रकरणी राहुलचा भाऊ सोमनाथ याने तिघांविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर किशोर शिवाजी जाधव, नीलेश सुशिम जाधव आणि जोतिराम किसन चेळके, (सर्व धोंडीवाडी) या तिघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालायाने १७ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

दहावीत शिकणाऱ्या मुलीची २५ फेब्रुवारी रोजी गावातीलच विहिरीत तोल जाऊन मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून तासगाव पोलिस  ठाण्यात नोंद झाली. 

या घटनेनंतर राहुलने याबाबत केरळला गलई व्यावसायिक असलेला त्याचा सख्खा भाऊ सोमनाथला २५ फेब्रुवारीला फोन वरून वरील माहिती देऊन तणावात असल्याचे सांगितले. सोमनाथने ‘मी गावाकडे येतो तू टेन्शन घेऊ नकोस’ असे सांगितले. मात्र कामामुळे सोमनाथ लगेच गावी येऊ शकला नाही. त्यामुळे ब्लॅकमेलिंगला घाबरून ५ मार्चला राहुलने धोंडेवाडी ते नरसेवाडीच्या दरम्यान रस्त्यालगत सातच्या सुमारास आत्महत्या केली. राहुलचा भाऊ सोमनाथने गावी आल्यानंतर राहुलने फोनवरून सांगितल्यानुसार संशयित किशोर जाधव, नीलेश जाधव, जोतिराम चेळके यांच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली.

Web Title: youth suicide in dhondewadi