जि.प. उमेदवारी अर्ज भरणाऱ्या युवकाला डांबले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

सातारा : सातारा जिल्हा परिषद नागठाणे गटातून आज अर्ज भरण्यासाठी सातारा तहसील कार्यालयात आलेले नारायाण सिताराम लोहार यांना युवकांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना वाहनात डांबून नेण्यात आले. 

लोहार यांचे अपहरण झाल्याची चर्चा तहसील कार्यालयात तसेच राजकीय वतृळात आहे. दरम्यान, नागठाणे गटातून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज समृध्दी जाधव व राजकुमार ठेंगे यांचे दोन अर्ज आले. नारायण लोहार हे नागठाणे गटातून अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यावेळी अज्ञातांनी तहसील कार्यालयाबाहेर लोहार यांना गाठले आणि मारहाण केली. 

या गटातून अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०१६ आहे. या गटाची निवडणूक २८ ऑगस्ट २०१६ आहे अशी माहिती तहसीलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली.