सोलापूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये ३९ जागा सर्वसाधारण, १८ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), १० जागा अनुसूचित जाती (एससी) तर एक जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षित करण्यात आली आहे. एसटीसाठी जिल्ह्यातील नव्याने तयार झालेला गोपाळपूर हा गट आरक्षित झाला आहे. या गटाचे नाव पूर्वी चळे होते.

गोपाळपूर गट एसटीसाठी

सर्वसाधारण ३९ जागा

नामाप्र १८ जागा

एससी १० जागा

एसटीसाठी एक जागा

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या ६८ जागांसाठीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये ३९ जागा सर्वसाधारण, १८ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), १० जागा अनुसूचित जाती (एससी) तर एक जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षित करण्यात आली आहे. एसटीसाठी जिल्ह्यातील नव्याने तयार झालेला गोपाळपूर हा गट आरक्षित झाला आहे. या गटाचे नाव पूर्वी चळे होते.

गोपाळपूर गट एसटीसाठी

सर्वसाधारण ३९ जागा

नामाप्र १८ जागा

एससी १० जागा

एसटीसाठी एक जागा

विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात ही सोडत काढण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार, उपजिल्हाधिकारी रेश्‍मा माळी, तहसीलदार उज्ज्वला सोरटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती अप्पाराव कोरे, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवानंद बिराजदार, शिवानंद पाटील, बाबा कारंडे, भाजपचे पंढरपूर तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, इंद्रजित पवार, अशोक शिंदे, शिवाजी घोडके-पाटील यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

पारस काळे व दीक्षा पवार या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या. सोडतीसाठी २०११ ची लोकसंख्या व २००२, २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीतील आरक्षणाचा विचार केला. ६८ पैकी ३४ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

आरक्षण स्थिती (कंसात महिलेसाठी आरक्षित जागा)

एकूण जागा  - ६८ (३४)

सर्वसाधारण  -  ३९ (२०)

नागरिकांचा मागास प्रवर्ग -  १८ (९)

अनुसूचित जाती  -  १० (५) 

अनुसूचित जमाती  -  १

मतदारसंघांची बदललेली नावे (कंसात नवीन मतदारसंघ) 

पोथरे-(पांडे), माढा-(उपळाई बु.), श्रीपतपिंपरी-(मालवंडी), टाकळी सिकंदर-(पेनूर), तुंगत-(रोपळे), चळे-(गोपाळपूर), गुरसाळे-(वाखरी), खर्डी-(टाकळी), खुडुस-(संग्रामनगर), वाढेगाव-(एखतपूर), घेरडी-(कडलास), चोपडी-(नाझरे), बोराळे-(संत दामाजीनगर), मरवडे-(हुलजंती), होटगी-(वळसंग) या गटांची नावे बदललेली आहेत. भोसे (ता. पंढरपूर), दहिगाव, मांडवे (ता. माळशिरस), घेरडी (ता. सांगोला), हत्तूर हे गट नव्याने तयार झाले आहेत. एकूण ६८ गटच कायम ठेवले आहेत. मात्र, मतदारसंख्येमुळे काही गटांचे विभाजन होऊन नवीन गट तयार झाले आहेत.

Web Title: zp reservation declare in solapur district

टॅग्स