पिंपरी : इंदिरा गांधी रेल्वे पुलावरून शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद

पिंपरीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुलावरून शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
Flyover
FlyoverSakal
Summary

पिंपरीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पुलावरून शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

पिंपरी - पिंपरीतील स्वर्गीय इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाच्या (Indira gandhi Railway Flyover) दुरुस्ती कामासाठी (Repairing Work) वाहतुकीत बदल (Transport Change) करण्यात आले आहेत. पुलावरून शगुन चौकाकडे (Shagun Chowk) जाणारी वाहतूक बंद (Close) ठेवण्यात येणार आहे.

या पुलाच्या दुरुस्ती कामातील तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील पिंपरी पूल ते पुलाच्या मध्यपर्यंत काम करण्याचे नियोजित आहे. यासाठी या पुलावरून शगुन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद केली जाणार आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनांसाठी भाटनगर मार्गे, रिव्हर रोड-कराची चौकापर्यंत वाहतूक दुहेरी मार्गाने राहणार आहे.

Flyover
पिंपरी : पाच कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर

तसेच निगडीतील मधुकरराव पवळे उड्डाणपुलाची रंगरंगोटी तसेच स्थापत्य विषयक कामासाठी हा पूलही वाहतुकीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

पुण्याकडून येणारी वाहने पुलावर न जाता डाव्या बाजूच्या ग्रेडसेप्रेटमध्ये आउट लेनमधून बाहेर पडतील. त्यानंतर टिळक चौकामार्गे सेवा रस्त्याने निगडी प्राधिकरण चौकीसमोरून पुढे जातील. तसेच मुंबईकडून येणारी वाहने पुलावरून निगडी गावठाण येथील हनुमान मंदिराशेजारी आउट लेनमधून बाहेर पडून टिळक चौकाकडे जातील. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com