वीज संकटास जबाबदार कंपन्यांवर कारवाई करा
Sakal

वीज संकटास जबाबदार कंपन्यांवर कारवाई करा

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी - पीएमआरडीए) झोन दाखले ऑनलाइन उपलब्ध होत आहेत.
Summary

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी - पीएमआरडीए) झोन दाखले ऑनलाइन उपलब्ध होत आहेत.

पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी - पीएमआरडीए) (PMRDA) झोन दाखले ऑनलाइन (Online) उपलब्ध होत आहेत. आधीच झोन दाखल्यांची (Certificate) रक्कम ५०० रुपये जास्त असल्याने, नागरिक मेटाकुटीला आले आहे. हे दाखले प्रत्यक्ष न देता ऑनलाइन दिले जात आहेत. त्यामुळे दाखल्याच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, नागरीकांना ऑनलाइन झोन दाखले गेल्या पाच दिवसांपासून मिळालेले नाहीत. सध्या २५० ते ३०० दाखले प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.

नागरिकांना झोन दाखले मिळण्यासाठी संगणकप्रणाली, तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे देखील उपलब्ध होत आहेत. झोन दाखला प्राप्त करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा (एनईएफटी, आरटीजीएस, नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड) पीएमआरडीएने केली आहे. १ नोव्हेंबर २०१९ पासून ऑनलाइन झोन दाखले सुविधा ही पूर्णतः रोकड विरहित झाली आहे. पीएमआरडीएकडून या सुविधेसाठी http://www.zonecertificate.pmrda.gov.in किंवा pmrdazonecertificate या ॲपवर हे दाखले उपलब्ध होत आहेत.

उत्पन्नवाढीसाठी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) विविध स्रोत वाढवत आहे. पीएमआरडीने ३० रुपयांमध्ये मिळणारा जमिनींचा झोन दाखल्याची किंमत ५०० रुपये केली आहे. या दर वाढीमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महात्मा गांधीच्या सत्याग्रहापूर्वीच इंग्रजांनी देश सोडला : कोश्यारी

झोन दाखला कशासाठी

लहान मिळकतीची खरेदी-विक्री, बांधकामांसाठी, एनएसाठी जमीन कोणत्या विभागात समाविष्ट केली आहे, हे पाहणे आवश्‍यक असते. त्यासाठी झोन दाखला महत्त्वाचा आहे. शेती, औद्योगिक, रहिवासी, ग्रीन झोन, हिल टॉप व हिल स्लोप झोन, शेती ना विकास झोन आदी प्रकारचे झोन आहेत. ज्या कारणासाठी जमीन ज्या विशिष्ट झोनमध्ये समाविष्ट केली आहे, त्या कारणासाठीच त्या जमिनीचा उपयोग करणे आवश्‍यक असते. त्यामुळे, जमिनीचा वापर करण्यापूर्वी संबंधित ठिकाणचा झोन पाहावा लागतो. नगररचना विभाग झोन दाखल्यांसाठी प्रत्येक एका गट किंवा सर्व्हेसाठी ३० रुपये आकारत होती. पीएमआरडीची स्थापना झाल्यावर, त्यांच्या हद्दीतील सुमारे ८०० गावांमधील झोन दाखले पीएमआरडीए देते. मात्र, उत्पन्नवाढीसाठी पीएमआरडीएने प्रत्येक गट किंवा सर्व्हेसाठीच्या झोन दाखल्यासाठी ५०० रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे. महापालिका हद्दीतील झोन दाखला १०० रुपयांना मिळत असताना पीएमआरडीए हद्दीतील गावांचे झोन दाखले मात्र ५०० रुपयांना देण्यात येतात, त्यामुळे नागरिकांच्या खिशाला भुर्दंड बसत आहे.

‘कार्यालय आकुर्डीला स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे विलंब लागत आहे. आज संकेतस्थळ सुरू झाले आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने बंद होते. दाखल्याच्या रकमेसंदर्भात काही अडचणी येत होत्या. त्यामुळे ते बंद होते.’

- विवेक खरवडकर, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com