बोट लाविन तिथे गुदगुल्या...पण स्वतःच्या स्वतःला नाही.....

आपण स्वतःलाच गुदगुल्या केल्या तर हसायला येईल? या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येईल. दुसऱ्या कोणी आपल्याला गुदगुल्या केल्या की हसायला येते, पण स्वतःच स्वतःला केल्या की येत नाही, याचे कारण शोधण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे.
बोट लाविन तिथे गुदगुल्या...पण स्वतःच्या स्वतःला नाही.....
बोट लाविन तिथे गुदगुल्या...पण स्वतःच्या स्वतःला नाही.....- Sakal

`बोट लाविन तेथे गुदगुल्या` असा एक वाक््प्रचार आहे. गंमत म्हणून एकमेकांशी खेळताना गुदगुल्या केल्या की त्याची अनुभूती येते. प्रत्येकाने असा अनुभव कधी ना कधी घेतलेला असेल. अशा गुदगुल्यांची मजा येते, मात्र अति गुदगुल्या सहन करायची वेळ आली की त्या खेळाचा समारोप रडण्यातही होऊ शकतो. पण स्वतःच्या हाताने स्वतःला गुदगुल्या होत नाहीत. असे का होते? याचा शोध बर्लिनमधील हुमबोल्ड विद्यापीठातील संशोधकांनी घेतला. गुदगुल्या केल्यानंतरच्या प्रतिक्रिया या मेंदूतील विशिष्ट भागात होणाऱ्या बदलांमुळे होत असतात. दुसऱ्याने स्पर्श केल्यानंतरच ही प्रतिक्षिप्त क्रिया घडते, असे संशोधकांना आढळून आले. (Know about tickle and the science behind it)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com