घाटांवर निर्माल्य संकलन मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (पीडीसीसी) आणि पुणे महानगरपालिका घनकचरा विभागातर्फे अनंत चतुदर्शीच्या दिवशी (ता. ५) रोजी पुणे व पिंपरी चिंचवड मधील सात प्रमुख घाटांवर निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. 

पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (पीडीसीसी) आणि पुणे महानगरपालिका घनकचरा विभागातर्फे अनंत चतुदर्शीच्या दिवशी (ता. ५) रोजी पुणे व पिंपरी चिंचवड मधील सात प्रमुख घाटांवर निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. 

पीडीसीसी बॅंकेच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त या सामाजिक उपक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप व इतर अधिकारी, कर्मचारी, पुणे विद्यार्थी सहायक समिती विद्यार्थी स्वयंसेवक, सकाळ निर्धार, चिंचवड येथील संस्कार प्रतिष्ठान आणि महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी एनएसएस विद्यार्थी असे एकूण १५० स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. मुळा मुठा नदीवरील सिद्धेश्‍वर-वृद्धेश्‍वर, भिडे पूल, पांचाळेश्‍वर मंदिर, एसएम जोशी पूल, चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर तसेच पिंपरी कॉलनीतील पवना घाटावर, स्वयंसेवक निर्माल्य संकलन व त्याबाबत जनजागरण करतील. या मोहिमेदरम्यान भाविकांकडून घाटावर मोठ्या कुंभामध्ये संकलित करण्यात आलेल्या निर्माल्याचे महापालिकेतर्फे पुनर्प्रक्रियेद्वारे खतामध्ये रूपांतर करण्यात येते. गतवर्षी महापालिकेकडून सहाशे टन निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात आली होती. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड व संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र असून २६१ शाखा व ५४ एटीएम सेवाकेंद्रामार्फत ग्राहकांना सेवा देण्यात येते. बॅंकेने या आर्थिक वर्षात सामोपचार कर्ज परतफेड योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ अनेक थकबाकीदारांना झाला आहे, असे बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले. या उपक्रमासाठी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजयकुमार भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमात निवडक गणेश मंडळांमध्ये स्वरूप वर्धीनी संस्थेचे विद्यार्थी पथनाट्य सादर करणार आहेत.

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस बरसत आहे. दोन ते...

04.18 PM

पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना...

11.12 AM

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM