पोलिसांचा निषेध म्हणून 'तांबडी जोगेश्‍वरी'ने वादन थांबविले 

प्रसाद पाठक
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

पुणे : पुण्यातील मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज (मंगळवार) लोकमान्य टिळक पुतळा ते गणपती चौक यादरम्यान गणपतीसमोरील ढोल-ताशा पथक, बॅंड पथक आणि नगारा वादन थांबविले.

गेल्या वर्षी तांबडी जोगेश्‍वरीसहीत 37 गणेश मंडळांवर पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा दाखल केला होता. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या मंडळाने हा मार्ग निवडला. 

'तांबडी जोगेश्‍वरी मंडळ दरवर्षी अतिशय शिस्तबद्ध मिरवणूक काढत असते. कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करत नाही. तरीही पोलिसांनी गेल्या वर्षी गुन्हे दाखल केलेल्या 37 मंडळांमध्ये तांबडी जोगेश्‍वरी मंडळाचाही समावेश करण्यात आला. ठरलेल्या डेसिबल्सपेक्षा जास्त आवाज झाल्याने मंडळाच्या बॅंडवर गुन्हा दाखल केला होता. यंदाही पोलिसांनी मिरवणुकीच्या दोन दिवस आधी पथकांच्या संख्येवर निर्बंध आणले. आम्ही त्यांना एवढे सहकार्य करत आहोत आणि ते आमच्यावर असे नियम लादत असतील, त्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला', अशी प्रतिक्रिया मंडळाच्या विश्‍वस्तांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.