तुकोबांच्या सोहळ्याला पिंपरीमधून निरोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

पिंपरी - मुखाने विठू नामाचा अखंड गजर आणि भगव्या पताका खांद्यावर घेऊन वैष्णवांचा मेळा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासमवेत भक्तिमय वातावरणात रविवारी पहाटे पुण्याकडे मार्गस्थ झाला. श्री संत गवरशेठ लिंगायत वाणी पालखी आणि श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पालख्यांनाही पिंपरी-चिंचवडकरांनी निरोप दिला. दापोडीत विसावा घेऊन तुकोबांची पालखी दुपारी दीडच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली. 

आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात शनिवारी रात्री पालखीचा मुक्काम होता. तेथे दर्शनासाठी भाविकांची लांब रांग लागली होती. दिगंबर कुटे यांच्या हस्ते समाजआरती झाली. नगरसेविका वैशाली काळभोर व मीनल यादव, संदीप कुटे, गोपाळ कुटे, गुलाब कुटे उपस्थित होते. भाविकांना महाप्रसाद वाटप केला. रात्री देशमुख महाराजांचे कीर्तन झाले. पुंडलिक महाराज मोरे यांच्या उपस्थित शेजारती झाली. त्यानंतर जागर झाला. रविवारी पहाटे काकड आरती व महापूजा झाली. त्यानंतर सोहळा पुणे-मुंबई महामार्गाने खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन, पिंपरी, खराळवाडी, कासारवाडी, फुगेवाडी मार्गे पुण्याकडे मार्गस्थ झाला. ठिकठिकाणी पालखीचे मनोभावे आणि उत्साहात स्वागत झाले. दर्शनासाठी भाविकांनी दुतर्फा गर्दी केली. मुंबई पुणे महामार्गाची डाव्या बाजू वाहतुकीसाठी बंद केली होता. ग्रेड सेपरेटर व उजव्या बाजूची वाहतूक फुगेवाडीतून वळविली होती.  

खराळवाडीतील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात सकाळी साडेसातच्या सुमारास पालखीचा पहिला विसावा झाला. वारकऱ्यांनी न्याहारी केली. पालखी व विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्तीची पूजा झाली. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी नऊच्या सुमारास पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. 

पुणे

नवरात्र उत्सव आजपासून (गूरूवार) सुरू होत आहे. देवीजवळ घटस्थापना करून कुलदैवतांचा जागर केला जाणार आहे. नवचंडिकेचे नऊ दिवस उपवास...

04.27 PM

नवी सांगवी : पिंपळे गुरव मध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ लल्या...

11.18 AM

नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण...

11.06 AM