पुण्यातील 11 पर्यटकांना अटक; दोन अल्पवयीन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

शिवोल - बेताळभाटी येथील बलात्काराची घटना ताजी असतानाच आता बागा-कळंगुट किनाऱ्यावर अल्पवयीन मुलीचा पुण्यातील 11 पर्यटकांनी विनयभंग केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी कळंगुट पोलिसांत तक्रार दिली असून, त्यानुसार 11 जणांना अटक केली. यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. 

रमेश कांबळे, संकेत भडाळे, कृष्णा पाटील, सत्यम लांबे, अनिकेत गौरव, ऋषिकेश गौरव, आकाश सावसकर, सनी मोरे व ईश्‍वर पगारे अशी संशयितांची नावे असून, त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागा किनाऱ्यावर भावासोबत बसलेल्या अल्पवयीन मुलीची किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील एका टोळक्‍याने आक्षेपार्ह छायाचित्रे काढत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान बाजूला असणाऱ्या तिच्या भावाने हा प्रकार पाहून त्या पर्यटकांना हटकले असता, पर्यटकांनी त्याला दमदाटी व शिवीगाळ करत मारहाण केली. याचवेळी त्या मुलीचे कुटुंबीय शॅकमध्ये बसलेले होते. त्यांच्याही निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी आपल्या मुलांना घेऊन थेट कळंगुट पोलिस ठाणे गाठले. 

दरम्यान, पोलिसांनी स्थानिक एनजीओच्या मदतीने अल्पवयीन मुलीसह तिच्या भावाची साक्ष नोंद केली. त्यानंतर निरीक्षक जीवबा दळवी यांनी गोव्यातून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या या पर्यटकांना अटक केली. यातील दोघे जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. 

मोबाईल जप्त 
भावासोबत समुद्र किनारी खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीची पर्यटकांच्या टोळक्‍याने आपल्या मोबाईलवर आक्षेपार्ह छायाचित्रे टिपली. तो मोबाईल कळंगुट पोलिसांनी जप्त केला असून, फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. 

Web Title: 11 tourists arrested from Pune