पोहण्यासाठी गेलेल्या बारा वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून म्रुत्यू

वडगाव आनंद - (ता. जुन्नर) येथे ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षाच्या मुलाचा म्रुत्यू झाला.
Sahil Lokhande
Sahil LokhandeSakal
Summary

वडगाव आनंद - (ता. जुन्नर) येथे ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षाच्या मुलाचा म्रुत्यू झाला.

आळेफाटा - वडगाव आनंद (Vadgaon Anand) - (ता. जुन्नर) येथे ओढ्यात पोहण्यासाठी (Swimming) गेलेल्या एका बारा वर्षाच्या मुलाचा म्रुत्यू (Death) झाला. असल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी ( दि १४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती अशी की, सध्या पिंपळगावजोगा कालव्याचे आवर्तन सुरु असून या कालव्याद्वारे वडगाव आनंद गावातील एका ओढ्यात पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साहील राजु लोखंडे (वय १२, राहणार-वडगाव आनंद) हा त्याच्या मित्रांसमवेत या ओढ्यात पोहण्यासाठी गेला होता. त्याचवेळी तो बुडू लागल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या साहील याच्या मित्रांनी आरडाओरडा केला.

त्यावेळी बाजूला असलेल्या नागरिकांनी साहील यास पाण्याबाहेर काढले व त्यास तात्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा म्रुत्यू झाला होता. याबाबतची खबर गोरक्ष मारुती लोखंडे (वय २५ वर्ष, राहणार-वडगाव आनंद, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात म्रुत्यू म्हणून केली असून, पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com