पिंपरी-चिंचवड शहरातील १९८ दारूची दुकाने झाली बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

पिंपरी - राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत असलेली दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार शनिवारपासून (ता. १) पिंपरी-चिंचवड शहरातील १९८ दारूची दुकाने सील करून बंद करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.

अनेक वाहनचालक दारू पिऊन वाहने चालविल्याने अपघात होतात. यामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंतची दारूची सर्व दुकाने, परमीट रूम, बिअर शॉपी व देशी दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. शनिवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड शहरातही सुरू केली आहे. 
 
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार खडकी ते चिंचवड या भागात महामार्गालगत असलेली ११३ दारूची दुकाने सील बंद करण्यात आली आहेत. तर चिंचवड ते देहूरोड या भागातील ४५ तर सांगवी ते वाकड या भागातील ४० दारूची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बंद केली आहेत.

बंद केलेल्या दारूच्या दुकानांचे परवाना मालकांच्या मागणीनुसार स्थलांतरित करून दिले जाणार आहेत. मात्र स्थलांतरित करतानाही परवाना देताना जसे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्‍यक असतात तशाच प्रकारचे परवाने आवश्‍यक आहेत. यामुळे नागरिकांनी जर योग्य कारण पुढे करीत हरकत घेतली तर नवीन दुकानांनाही स्थलांतरणाकरिता परवाना मिळणे मुश्‍कील आहे.