पुणे जिल्ह्यातील 4 लाख 69 हजार विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तके

Books
Books

शिर्सुफळ - सारे शिकूया पुढे जाऊया असे म्हणत सुरू केलेल्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील पहिले ते आठवीच्या शाळांमधील 4 लाख 69 हजार 269 विद्यार्थ्यांना यंदा मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये पहिल्याच्या व आठवीच्या तिन विषयांची पुस्तके अद्यापही उपलब्ध झाली नाहीत. याबाबत वरिष्ठ पातळीवरुन पाठपुरावा सुरु आहे.लवकरच संबंधित पुस्तके तालुकास्तरावर पाठविण्यात येतील अशी माहिती शिक्षण विभागातील सुत्रांनी दिली.

जिल्हा कार्यालयातुन तालुकास्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. तेथुन शाळास्तरावर पुस्तके वितरीत करण्यात येत आहेत. या माध्यमातुन सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच पुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी एका शासकिय निर्णयानुसार पाठ्यपुस्तकांचे थेट वितरण न करता पाठ्यपुस्तकांची रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचे नियोजन होते. मात्र निर्धारित कालावधीत सर्वच विद्यार्थ्यांचे बँक खाते नव्हेते यामुशे थेट लाभ योजनेतून यंदातरी पाठ्यपुस्तक योजनेला वगळले व पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्याचा निर्णय घेतला.

या दृष्टीने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावेत, यासाठी शिक्षण विभागाच्या मार्फत नियोजन केले. सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आली. त्यानुसार 2017-18 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात 4 लाख 69 हजार 269 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. यामध्ये मराठी माध्यमाच्या 4 लाख 47 हजार 746, हिंदी माध्यमाच्या 1 हजार 831, इंग्रजी माध्यमाच्या 14 हजार 237,व उर्दु माध्यमाच्या 5 हजार 455 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या नियोजनानुसार जिल्हास्तरावरुन प्रत्येक तालुक्यात इयत्ता पहिली व आठवीच्या काही विषयांचा अपवाद वगळता जवळजवळ सर्व पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. ही पुस्तके तालुकास्तरावर उपलब्ध करून दिली आहेत. त्यानंतर मुख्याध्यापक पुस्तके शाळांमध्ये घेऊन जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे.तर जिल्ह्यात पहिलीसाठी 50 हजार 783, दुसरीसाठी 51 हजार 833, तिसरीसाठी 54 हजार 145, चौथीसाठी 55 हजार 448, पाचवीसाठी 55 हजार 946, सहावीसाठी 59 हजार 148, सातवीसाठी 60 हजार 148, आठवीसाठी 59 हजार 495 पुस्तके पाठविण्यात आली आहेत.यापैकी पहिली व आठवीच्या तिन विषयांचा अपवाद आहे.

नवागतांचे शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांसह वाजत गाजत होणार स्वागत 
              
15 जून पासून जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध व्हावी, या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. त्यानुरुप कोणत्याही स्थितीत सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके देऊन त्यांचे शाळेत स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे नवगतांचे शिक्षणाच्या प्रवाहात वाजत गाजत स्वागत करण्यात येणार आहे.
- विवेक वळसे पाटील (उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे) 

जिल्ह्यात मोफत पुस्तके पात्र विद्यार्थी संख्या खालीलप्रमाणे..
1) आंबेगाव - 22434
2) खेड - 49525
3) जुन्नर - 37284
4) मावळ - 34018
5) मुळशी - 20269
6) भोर - 16180
7) वेल्हे - 5005
8) शिरूर - 47409
9) हवेली - 65928
10) पुरंदर - 22897
11) दौंड - 40537
12) इंदापुर - 44165
13) बारामती 42395
एकूण  4 लाख 47 हजार 746

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com