९० कोटींचा अर्थसंकल्प सादर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

लोणावळ्यात भांडवली खर्चात दहा कोटींनी वाढ

लोणावळा - लोणावळा नगरपालिकेचा २०१७-१८ या सालासाठी ८९ कोटी ७४ लाख ४हजार ५२ रुपयांच्या, तर ५३ लाख ९४ हजार रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास लोणावळा नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वसाधारण व भांडवली जमा-खर्चात १० कोटींच्या रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे.

तुंगार्ली येथील नगरपालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी सचिन पवार, नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी विशेष अर्थसंकल्प सादर केला.

अर्थसंकल्पात फारसे विशेष काही नसले तरी भांडवली व महसुली जमापैकी निम्मी रक्कम सामान्य प्रशासनावरच खर्च करण्यात येणार आहे.

नगरपालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठा अर्थसंकल्प सादर झाला असला तरी महसुली उत्पन्नातून संकलित कर, पाणीपट्टी आदींसह  १८ कोटी १६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. विकासकामांसाठी अनुदान व अंशदानपोटी २६ कोटी २१ लाख अपेक्षित जमेची बाजू दर्शविण्यात आली आहे. नगर परिषदेच्या वतीने अग्निशमन कर ९० लाख, नगर परिषद मिळकती भाडे, व्याज, सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन कर यांचा पर्याय पुढे करण्यात आला आहे. मुदत ठेवींवर व्याजापोटी साडेतीन कोटी रुपये उत्पन्न नगरपालिकेस मिळणार आहेत. याचबरोबर पाणी टॅंकर्स फी, प्रदूषणकर व पर्यटन कराचाच पर्याय नगरपालिकेकडे आहे. मात्र, शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकास योजना व प्रकल्पांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या अनुदानांवर नगरपालिकेस अवलंबून राहावे लागणार आहे. पाणीपुरवठ्यावर ५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला असून, मलनिस्सारण २० लाख व रुग्णालय तसेच दवाखाना वेतनावर १ कोटी १० लाख रुपये खर्च होणार आहे. नगरपालिका मालमत्ता भाडे, हस्तांतर फी, दुकान भाडे, अतिक्रमण फी आदी विविध भाड्यांपोटी उत्पन्न अपेक्षित आहे. जवळपास ५३ लाख रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकात महसुली खर्चातून करण्यात येणारा प्रशासकीय खर्च पन्नास टक्‍क्‍यांच्या पुढे असून, विकासकामांसाठी नगरपालिकेस शासनाच्या अनुदानांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी 
८९ कोटी ७४ लाख ४४५२ हजार रुपयांचा अर्थसंकल्प
५३ लाख ७३ हजार रुपयांची शिल्लक
संकलित करातून १८ कोटी १६ लाख मिळणार
अनुदान २६ कोटी २१ लाख
आरोग्य सुविधेवरील खर्च २२ कोटी
शिक्षणावरील खर्च १० कोटी
सामान्य प्रशासन व कर्मचाऱ्यांचे पगार १० कोटी 

Web Title: 90 caror budget declare