पुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

संतोष आटोळे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या, तसेच रिक्त जागा असणाऱ्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक जाहिर केली आहे. त्यानुरुप काल (ता.23) मध्यरात्रीपासुनच आचारसंहिता लागु करण्यात आलेली आहे. तर रविवार (ता.27 मे) रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीच्या पूर्ण तर 258 ग्रामपंचायतीच्या 456 जागांसाठीच्या पोटनिवडणुक कार्यक्रमाचा समावेश आहे. यामुळे गावपातळीवर राजकिय रणधुमाळीला सुरवात झाली आहे.

निवडणुक आयोगाने केलेल्या घोषणेनुरुप थेट सरपंच पदासह सदस्य पदासाठीच्या जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. यामध्ये 27 एप्रिल रोजी तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे, सोमवार (ता.07 मे) ते शनिवार (12 मे ) या कलावाधीत अर्ज दाखल करणे, सोमवार (ता.14 मे) रोजी अर्ज छाननी, बुधवार (16 मे ) अर्ज माघारी घेणे, व त्याच दिवशी चिन्ह वाटप, तर रविवार (ता.27 मे) रोजी मतदान होणार आहे. यामध्ये सर्वाधिका बारामती तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तर पुरंदर मधिल नव्याने स्थापन झालेल्या वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी यांसह इतर 13 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील 258 ग्रामपंचायतींच्या 456 रिक्त पदांच्या निवडणुका सुध्दा याच कालावधीत पार पडणार आहेत.

निवडणुका जाहिर होणारा तालुका, ग्रामपंचायत संख्या, ग्रामपंचायतीचे नाव खालील प्रमाणे - 
1) वेल्हा - 1

साईव बु.
2) मावळ - 7
ओवळे, दिवड, कल्हाट, सुद्रुंब्रे, सुदवडी, कोंडीवडे अ.मा., जांबवडे
3) भोर - 6
रायरी, अशिंपी, करंजे, नाटंबी, शिळींब, वारवंड,
4) जुन्नर - 3
बेल्हा, गुंजाऴवाडी, तांबेवाडी,
5) मुळशी - 1
मुळशी खर्द,
6) पुरंदर - 13
एखतपुर-मंजवडी, राजूरी, माळशिरस, वनपुरी, उदाचीवाडी, वीर, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, 
7) खेड - 13
सुपे, कोहिनकरवाडी, सातकरस्थळ, सांडभोरवाडी, वाहागांव, मोरोशी, डेहणे, आडगाव,वाळुद, वाघु, एकलहरे, तिफनवाडी, धुवोली,
8) आंबेगाव - 10
पारगाव त.अवसरी बु., टाव्हरेवाडी, कानसे, चपटेवाडी, सुपेधर, अवसरी बु., फुलवडे, डिंभे बु., तांबडेमळा, लोणी,  
9) बारामती - 15
वंजारवाडी, कोऱ्हाळे खुर्द, करंजे, सुपे, शिर्सुफळ, चांदगुडे वाडी, भोंडवेवाडी, साबळेवाडी,मगरवाडी, काळखैरेवाडी, जराडवाडी, उंडवडी क.प.,दंडवाडी, पानसरेवाडी, कुतवळवाडी, 
10) शिरुर - 6
आण्णापूर,शिरुर ग्रामीण, सरदवाडी, कर्डेलवाडी, तार्डोबाचीवाडी, वाजेवाडी, 
11) इंदापूर - 5
लाकडी, बावडा, वकिलवस्ती, काझड, शिंदेवाडी, 
12) दौंड - 10
कुरकुंभ, वाटलुज, नायगांव, वडगाव बांडे, पानवली, केडगाव, वाखारी, पारगांव, खोपोडी, पांढरेवाडी,

एकूण - 90 
 
Web Title: 90 grampanchayat election program declared im pune district