लोणावळ्याजवळ अपघातात दोन जण ठार

भाऊ म्हसाळकर
सोमवार, 22 मे 2017

अपघातात कारमधील एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

लोणावळा - मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर  लोणावळ्याजवळील वलवण येथे आज (सोमवार) सकाळी कार व ट्रकच्या भीषण धडकेत दोन जण जागीच ठार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. सँट्रो कारला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून, अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

अपघातात कारमधील एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.