नागरिकांच्या प्रसंगवधानामुळे अपघात टळला

wadgaon
wadgaon

वडगाव निंबाळकर - उच्च दाबाच्या वीज वाहक तारेवर झाडाची फांदी घासुन ओल्या झाडाने पेट घेतला. प्रसंगवधान राखत महावितरणला कळवुन वीज पुरवठा थांबवल्याने पुढील अनर्थ टळला नीरा बारामती मार्गावर वडगाव निंबाळकर येथिल शिंदे वस्तीसमोरील सोमवार ता. १६ सकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडली.

सोमेश्र्वरनगर येथुन कोऱ्हाळे बुद्रुकच्या दिशेने ३३ केव्ही उच्चदाबाची वीज वाहिनी गेली आहे. येथील शिंदे वस्तीसमोरील बाभळीच्या झाडांची फांदी सकाळपासुन चाललेल्या पावसामुळे तारांवर झुकली तारांवर झाडाचा स्पर्श होताच फांदीने पेट घेतला. पडत्या पावसात झाडामधुन धुर, जाळ येत असल्याचे येथुन जाणाऱ्या वाहन चालक सनी प्रसाद यांनी पाहिले. पंचायत समितीचे माजी उप सभापती अविनाश शिंदे यांना ही बाब सांगीतली. प्रसंगवधान राखुन शिंदे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना फोन करून माहीती दिली. अपघात घडु नये यासाठी शिंदे महावितरण कर्मचारी येई पर्यंत थांबुन होते. 
दरम्यान, पावसाचा वेग वाढल्याने पेटलेले झाड विझले येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता डी. एस ढमाले यांनी वीज पुरठा थांबवुन घटनास्थळावरील फांदी हटवण्याचे काम केले. झाड व तारांच्या अधीक घर्षणातून गरम झालेली तार तुटली असती तर अपघात झाला असता. यातून पावसामुळे झालेल्या ओलेपणामुळे कदाचीत जिवीतहानी झाली असती प्रसंगवधानामुळे अपघात टळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com