भाटनगरमध्ये पैसे वाटपावरून हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पिंपरी- भाटनगर येथे मतदारांना पैसे वाटण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भांडणातून भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरुद्ध चिंचवड पोलिस ठाण्यामध्ये परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री आनंदनगर येथे घडली. 

भाजपचे शैलेश प्रकाश मोरे आणि राष्ट्रवादी पक्षाचे काळूराम मारुती पवार अशी गुन्हा दाखल झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. विजयनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर प्रभाग क्रमांक १९ मधून मोरे आणि पवार हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. शनिवारी रात्री या भागातील मतदारांना पैसेवाटप सुरू असल्याची 

माहिती दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना मिळाली. रात्री चिंचवड स्टेशन येथे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने दोघांमध्ये वाद झाले. 

वादाचे रूपांतर भांडणामध्ये होऊन दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. यामध्ये एक कार्यकर्ता जखमी झाला असून, पिंपरीतील यशवंतराव चव्हाण  रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भाजपचे मोरे यांच्यावर दंगल माजविल्याप्रकरणी, तर राष्ट्रवादीचे पवार यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Action in the allocation of money from the Bhatnagar