आडत खरेदीदारांकडून वसुलीचा आडत्यांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

‘‘बाजार समित्यांमधुन फळे भाजीपाला नियनमुक्तीचा निर्णयाकडे आडते, व्यापाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पाहिले पाहिजे. बदलाला सामोरे जात नवनवीन बदल स्वीकारत आपली कार्यपद्धती अधुनिक करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विकण्यासाठी वेळ नाही, पण आडत्यांनी पारदर्शी सेवा दिली तर शेतकरी तुम्हाला सोडुन कुठेही जाणार नाही. तुमचा व्यापार आणि बाजार समित्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे.‘‘ 

- पाशा पटेल, शेतकरी नेते. 

पुणे - बाजार समित्यांमधुन फळे भाजीपाला नियमनमुक्तीच्या विरोधात आडत्यांनी पुकारलेला बंद तीन दिवसांनी काल (बुधवारी) संध्याकाळी मागे घेतल्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये आज (गुरुवारी) बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ७०० लहान मोठ्या वाहनांमधुन मोठ्याप्रमाणावर आवक झाली. यावेळी खरेदीदार आणि ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी आडत्यांनी आडत खरेदीदारांकडुन वसुलीचा एकमुखी निर्णय बैठकीत घेतला. 

यावेळी बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे म्हणाले, ‘‘तीन दिवसांच्या बंद नंतर आज भाजीपाल्याची ७०० लहान मोठ्या वाहनांमधुन आवक झाली. यावेळी सर्व व्यवहार सुरळीत होते. सर्व आडते व्यापाऱ्यांनी खरेदीदारांकडुन आडत घेण्याचे मान्य केल्याने आडत वसुलीबाबत कोणतीही अडचण आलेली नाही. बंद काळात शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समिती आणि शेतकरी संघटनांनी केल्यानंतर दिवसागणिक शेतमालाची आवक वाढत होती. शेतकऱ्यांचा आलेला सर्व शेतमाल सुरळीतपणे विक्री झाला. शेतकरी संघटनांचे नेते रघुनाथदादा पाटील, खा. राजू शेट्टी यांनी बंद काळात बाजार समित्यांमध्ये येऊन शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविले, शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढविण्याचे काम त्यांनी केल्याने समितीचे कामकाज सुरळीत पार पडले.‘‘ 

दरम्यान, बंदच्या पाश्‍र्वभुमीवर शेतकरी नेते आणि माजी आमदार पाशा पटेल यांनी बाजार आवाराची पाहणी करत शेतकरी आणि आडत्यांशी संवाद साधत नियमनमुक्तीबाबतची मते जाणुन घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी नियमनमुक्ती फायद्याची असल्याचे सांगत निर्णयाचे स्वागत केले. तर काही आडत्यांनी नियमनमुक्ती व्यवहार्य नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. पटेल यांच्या समवेत बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, संचालक मंगेश मोडक, गोरख दगडे उपस्थित होते.

आडत खरेदीदारांकडुन वसुलीचा एकमुखी निर्णय 

आडत कपातीवरुन आडत्यांमध्ये संभ्रम असताना, आडते असोसिएशनची बैठक गणपती मंदिरात पार पडली. यावेळी आडत खरेदीदारांकडुन वसुल करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

पुणे

पुणे: "कष्टकरी व सरकारी कर्मचारी यांचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्याची गरज आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी मी आत्तापर्यन्त प्रयत्नशील...

04.57 PM

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अंतर्गत भागात पीएमपी बससेवा पुरेशा प्रमाणात नाही, असे आहे लोकप्रतिनिधींचे म्हणणे. त्यासाठी...

04.21 PM

खडकवासला - पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या चारही धरणात पाऊस पडत आहे. खडकवासला वगळता...

12.36 PM