विकासकामांमुळे पुन्हा राष्ट्रवादीच सत्तेवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

वडगाव शेरी - सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी खोटी आश्वासने देऊन नागरिकांना भुलवण्याचे विरोधकांचे प्रयत्न नागरिकांनी ओळखले आहेत, त्यामुळे केंद्रात, राज्यात खोटी आश्वासने देऊन विश्वासघात केलेल्यांना जनता घरचा रस्ता दाखवेल, अशी टीका राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश आढाव आणि उषा कळमकर यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस विकासकामांच्या जोरावर पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

प्रभाग तीनमधील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश आढाव, आनंद सरवदे, उषाताई कळमकर, सुरेखा खांदवे यांनी पदयात्रेतून मतदारांशी संपर्क साधला. या वेळी ते बोलत होते. 

विमाननगरमध्ये नगरसेवक असताना राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे केली आहेत. तशीच विकासकामे सोमनाथनगर, गांधीनगर, खेसे पार्क, लोहगाव परिसर, संजय पार्क, म्हाडा सोसायटी, हाउसिंग बोर्ड, शांतिरक्षक सोसायटी आणि संपूर्ण प्रभागात केली जातील, असे चारही उमेदवारांनी सांगितले. 

रमेश आढाव आणि आनंद सरवदे म्हणाले, ""प्रभागात खऱ्या अर्थाने नागरिकांपर्यंत पोचणाऱ्या विकासकामांना प्राधान्य देणार आहे. प्रभागातील ऍमेनिटी स्पेसचा उपयोग करून आणि त्यासाठी जनतेची मते लक्षात घेऊन तेथे लोकोपयोगी उपक्रम व प्रकल्प राबवले जातील.'' 

उषा कळमकर आणि सुरेखा खांदवे म्हणाल्या, ""प्रभागात पार्किंगची समस्या मोठी आहे. त्यासाठी बहुमजली वाहनतळ उभारले जाईल. तसेस प्रभागातील लहान मुलांसाठी थीम उद्यान उभारण्याचे नियोजन आहे. प्रभागात चागंले प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाईल.''