इंदापूरचे सिंघम तहसिलदार श्रीकांत पाटील

patil
patil

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच शासनाने दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्त महसूल वसूली तहसिलदार श्रीकांत पाटील व सहकाऱ्यांनी केली. कमी मनुष्यबळ असताना देखील श्री.पाटील यांनी 2 कोटी 50 लाख 753 हजार रूपये इतका दंड वाळू, माती, मुरूम, डबर अवैधमाफींया कडून वसूल करण्याची किमया साधली आहे. त्यामुळे माफीयांना चाप बसला 
असून त्यांची बदली व्हावी म्हणून माफियांनी देव पाण्यात घातले आहेत.

अ पत्रक मध्ये 1 कोटी 72लाख 56 हजार 923 रूपये शासनाने उद्दीष्ट होते. परंतु 1 कोटी 99 लाख 48 हजार 552 इतका वसूल त्यांनी केला. यामध्ये 27 लाख 84 हजार 109 रूपये अशी 116 टक्के विक्रमी वसुली झाली आहे. या कामाचे बक्षीस म्हणून शासनाने त्यांच्याकडे दौंड तालुक्यातील गौण खनिज नियंत्रणाचे काम दिले. तेथे देखील त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. याबरोबरच त्यांनी सातबारा संगणकीकरणात तळातील इंदापूर तालुका जिल्ह्यात अग्रगण्य क्रमांकावर नेले आहे. तहसिल कार्यालयात झीरो पेंडसी केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचाआदर्शइंदापूर पॅटर्न तयार झाला असून त्यांना सिंघम अधिकारी म्हणून ओळखले जात आहे. 

तालुक्यांत अवैध गौणखनिज माफियावर जोरदार कारवाई झाल्या. मात्र त्याचा तहसिल कार्यालयातील आर्थिक ताळमेळ कधी जुळला नाही. त्यामुळे शासनाचा महसुल बुडतअसल्याने दीड वर्षापुर्वी इंदापूरचा पदभार स्विकारलेल्या तहसिलदार पाटील यांनी निरा, भिमा नद्या तसेच उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील अवैध वाळू उपश्यास धाडसाने लगाम घातला. 113 वाहने तसेच वाळू उपश्यास मदत करणारे जेसीबी, ट्रॅक्टर, बोटींवर त्यांनी थेट कारवाई केली. 

तालुक्यांसाठी 1 कोटी 50 लाख रूपये उद्दीष्ट गौणखणिज वसूलीचे असताना त्यांनी 2 कोटी 50 लाख 7 हजार 531 रूपयांची वसुली केली. रिव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेटचे उद्दीष्ट देखील त्यांनी पुर्ण केले. निरा व भिमा नदी तसेच उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मागील काळात बेसुमार अवैध वाळू उपसा झाला. त्यास झारीतील शुक्राचार्यांचे पाठबळ होते हे उघड गुपीत आहे. त्यामुळे अनेक सोने गुंठा मंत्री तयार झाले. त्यातून माफियांचा दरारा वाढला. त्यातून दोन खून झाल्याने तालुका माफियांचा तालुका म्हणून ओळखला जात होता. तहसिलदार पाटील यांनी याचा अभ्यास करून कारवाईसाठी आराखडा तयार केला. निरा नदी पात्रालगत ओझरे, गोंदी, गिरवी, टण्णू, नरसिंहपूर, पिंपरी बुद्रूक, गणेशवाडी, सराटी, चाकाटी, निरनिमगाव, खोरोची, कुरवली, कळंब, बोराटवाडी, निमसाखर, चिखली, जांब, उद्धट, उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील अजोती, सुगाव, कांदलगाव, शहा, महादेवनगर, पडस्थळ, शिरसोडी, कालठण नं. 2, कळाशी, चांडगाव, पळसदेव, भिगवण तसेच भिमा नदीपात्रातलगत शेटेवस्ती, भाटनिमगाव, भांडगाव परिसरात अवैध 
वाळूव्यवसायावर त्यांनी थेट कारवाई केल्याने अवैध माफियांचे व्यवसाय बंद पडले. त्यासाठी पाटील यांनी मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, पोलीस व वनखात्याचे कर्मचा-यांची पथके तयार करून त्यांच्यासमवेत अहोरात्र कारवाई केली.

वाळू वाहतूक तसेच नदीपात्रातील फायबर बोटीवर कारवाई केली. बोटी पकडून बोटींना जलसमाधी देणे, स्फोटकाने उडविणे अशी धडक कारवाई केली. यासंदर्भात त्यांनी पोलीसठाण्यात गुन्हे दाखल केले. मात्र एका प्रकरणात प्रांत कार्यालयातून सुत्रे हलून जप्त वाळू ट्रक सोडले गेले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. मात्र त्यामुळे नाऊमेद न होता सत्यमेव जयते तत्वाने तसेच धमक्यांना न घाबरता कारवाई करत त्यांनी व सहका-यांनी जीव धोक्यात घालून शासनाचा महसूल वाढविला. त्यामुळे तहसिलदार पाटील व सर्व कर्मचा-यांचा सत्कार होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com