अजित पवार यांचा 15 दिवसांतील तिसरा दौरा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पिंपरी - शहरातील 14 विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनानिमित्त मंगळवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा शहरात येणार आहेत. 

येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागण्याची दाट शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन उरकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची लगीनघाई सुरू आहे. 21 डिसेंबरला 17, 25 डिसेंबरला सात विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले होते. मंगळवारी त्यांच्या हस्ते सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत आणखी 14 विकासकामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. 

त्यामध्ये प्रामुख्याने निगडी, भक्ती-शक्ती उद्यानात देशातील सर्वाधिक उंचीचा (107 मीटर) राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. त्याच्या कामाची सुरवात, चिंचवडगावातील जिजाऊ पर्यटन केंद्र, संत तुकारामनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील "बेटी बचाओ' शिल्प, महेशनगर चौकातील संस्कार शिल्पाचे उद्‌घाटन केले जाणार आहे. त्याशिवाय दापोडी येथील भुयारी मार्ग, सांगवी-मधुबन सोसायटी येथील अंतर्गत रस्ते व सिमेंट रस्ते, संत तुकारामनगरमधील बहुउद्देशीय इमारत या कामांचे भूमिपूजन, तसेच मोहननगर-ईएसआय हॉस्पिटल चौकातील गाय वासरू शिल्पाचे अनावरण केले जाणार आहे. 

राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत शहरातील पात्र फेरीवाल्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. वल्लभनगर येथील एसटी स्थानकासमोर दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम होईल. 

दौऱ्याचा समारोप सायंकाळी साडेसहा वाजता सांगवी येथील तानाजीराव शितोळे शिवसृष्टी उद्यानात होईल. येथील ध्यानधारणा केंद्राचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर त्यांची सभा होईल.

पुणे

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) सुमारे 800 नव्या बसगाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी...

09.06 AM

पुणे - कर्वे रस्त्यावर वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस हवालदारास एका दुचाकीस्वार व्यक्‍तीने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली...

08.48 AM

पुणे - जमीन, घर खरेदी विक्रीसाठी बाजारभावापेक्षा जास्त दराने मुद्रांकशुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यावर उपाय...

05.33 AM