‘देवराई संवर्धनासाठी लोकांनीच पुढाकार घ्यावा’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

पुणे - ‘‘देवराई ही संस्कृती-परंपरेचा एक भाग आहे. तिला मोठे महत्त्व आहे; पण काळ बदलताना देवराईच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना नसल्याने तिचा ऱ्हास होत आहे. वन विभाग असो वा खासगी जागांवरील देवराईच्या व्यवस्थापनातील त्रुटी, लोकांची उदासीनता, अर्थव्यवस्थापन अशा विविध गोष्टींमुळे तिचा ऱ्हास होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी लोकसहभागाची गरज असून, देवराईच्या संवर्धनासाठी आता लोकांनी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन राज्याचे निवृत्त मुख्य वनाधिकारी माधव गोगटे यांनी सोमवारी केले. 

‘महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी’तर्फे आयोजित कार्यक्रमात गोगटे ‘देवराई संवर्धन’ या विषयावर बोलत होते. संस्थेचे कार्यवाह डॉ. अजित वर्तक या वेळी उपस्थित होते. गोगटे यांनी देवराईची उत्पत्ती, तिचा इतिहास, सद्य:स्थिती, वन विभागाची भूमिका आणि देवराईचे महत्त्व उलगडले.
गोगटे म्हणाले, ‘‘लोकभावनेने व सहभागाने काही भागांमध्ये निसर्ग संवर्धनाची पूरक कामे अत्यंत प्रभावीपणे होत आहेत; पण देवराईच्या संवर्धनासाठीही लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. मी देवराईचा अभ्यास केला. त्यात अनेक गोष्टी आढळून आल्या. देवराईचा उल्लेख कथा, दंतकथा व ऐतिहासिकसंदर्भात आढळतो. देवराईच्या उत्पत्तीसंदर्भात अनेक कथाही ऐकायला मिळतात; मात्र देवराईची संकल्पना ही अनेक जण अमान्य करतात. देवराई अनेक काळापासून आहेत आणि ती आपल्या संस्कृती-परंपरेचा भाग असल्याचा लोकांचा समज आहे. फार पूर्वीपासून देवराईच्या संवर्धनासाठी व व्यवस्थापनासाठी लोक काम करत आहेत; पण काळ बदलताना त्यात अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. यात वेळीच बदल होणे आवश्‍यक आहे.’’

देवराई संवर्धनासाठी अनेक उपाय 
‘‘देवराईच्या संवर्धनासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा. देवराईच्या संवर्धनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वन कायद्यातील तरतुदींचा आधार घ्यावा. देवराईचे व्यवस्थापन योग्यरीत्या होत आहे की नाही याबद्दल माहिती अधिकारांतर्गत माहिती मिळवावी. असे अनेक उपाय करून देवराई संवर्धनासाठी आपण करू शकतो,’’ असे माधव गोगटे यांनी सांगितले.

Web Title: and take the initiative devarai conservation