Atal Bihari Vajpayee : अटलजींचे इंदापूर येण्याचे राहून गेले....

Atal Bihari Vajpayee can not visit to Indapur
Atal Bihari Vajpayee can not visit to Indapur

वालचंदनगर -  इंदापूरचे तत्कालीन नगराध्यक्ष व सध्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व वालचंदनगर चे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते अतुल तेरखेडकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना इंदापूर मध्ये कार्यक्रमासाठी आणण्यासाठी पुण्यामध्ये १९९२ अटलजीची यांची भेट घेतली होती. गारटकर व तेरखेडकर यांनी अटलजी यांच्याविषयीच्या अाठवणीला उजाळा दिला.

१९९२ मध्ये इंदापूर नगरपालिकेवरती गारटकर यांची सत्ता होती. गारटकर हे नगराध्यक्ष होते. नगरपालिकेच्या माध्यातून वाजपेयी यांना सन्मानपत्र देवून गौरविण्याचे नियोजन करण्यात आले होते. गारटकर व तेरखेडकर यांनी करुन दोघेही फेब्रुवारी १९९२ मध्ये पुणे येथे हॉटेल श्रेयस मध्ये भेटण्यासाठी गेले. सुमारे चाळीस मिनीटांची भेट झाली, गप्पागोष्टी झाल्या. दोघांनीही इंदापूर येथे येण्याचे निमंत्रण दिले. त्यावेळी त्यांनी जरूर येऊ असे म्हटले, परंतु आपण मला तुम्ही कशासाठी बोलावत आहात? असा प्रश्न केल्यानंतर आम्ही आपणास इंदापूर नगर परिषदेच्या वतीने सन्मानमानपत्र देऊ आपला गौरव करी इच्छुतो, असे सांगितल्यानंतर वाजपेयी यांनी हसून 'कैसा मानपत्र, कैसा सन्मानपत्र, सब कुछ तो मुझे मिल चुका है ! बस आप मुझे एक पत्र दीजिये मैं आ जाऊंगा ! शायद दिसंबर में आ सकता हूं आप हमें पत्र दिजीये !' असे सांगितले होते.

परंतु नंतर डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येत बाबरी मशिदीचे प्रकरण झाल्यानंतर वाजपेयींना इंदापूरला येणे झाले नाही.त्यांची इंदापूर भेट अधुरी राहिली. वाजपेयींना भेटणण्याचा तीन-चार वेळा योग आला. त्यांच्या सहवास लाभला. आजही ते प्रसंग, त्या घटना, त्या आठवणी, ते शब्द माझ्या नजरेसमोरून हलत नाहीत. वाजपेयी यांनी संस्कृती शिकवली. वयाच्या दहा बारा वर्षांपासून मी अटलजी वाजपेयींचा चाहता असल्याचे तेरखेडकर यांनी सांगितले. भाजपचे युवराज म्हस्के, बाबासाहेब चवरे, मल्हारी जाधव यांनीही अटलजी वाजपेयीविषयीच्या आठवणीला उजाळा दिला. १९९३ साली दिल्लीमध्ये जावून त्यांची भेट घेतल्याचे सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com