कार घेण्याचे स्वप्न करा साकार 

कार घेण्याचे स्वप्न करा साकार 

पुणे - अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आपल्या घरी स्वप्नातील कार यावी, असे प्रत्येकालाच वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी "सकाळ माध्यम समूहा'ने शनिवारी (ता. 15) भव्य "ऑटो एक्‍स्पो 2017' चे आयोजन केले आहे. 

शुभमुहूर्तावर आपल्या घरी आवडती कार दाखल व्हावी, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, ऐनवेळी कार घ्यायची म्हटल्यावर ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या फीचर्सची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे अशा शेकडो प्रश्‍नांची उत्तरे शोधत फिरावे लागते; पण या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे जेव्हा एकाच छताखाली मिळतात, तेव्हा खऱ्या अर्थाने कार घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरते. याचाच विचार करून "सकाळ'ने दोन दिवसांच्या ऑटो एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. गाडी घेणाऱ्यांसाठी हा एक्‍स्पो महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, येथे विविध कार ब्रॅंडस्‌च्या फीचर्सची माहिती मिळणार आहे. शिवाय नव्या आणि प्री-ओन्ड कारची मोठी शृंखलाही पाहायला मिळणार आहे. 

यामध्ये ह्युंदाई, विराज स्कोडा, विद्युत मोटर्स- फोक्‍सवॅगन, रोहर्ष मोटर्स- रेनॉ, होंडा कार्स, माय कार नेक्‍सा आदी कंपन्या सहभागी होणार असून, मारुती ट्रू व्हॅल्यूच्या प्री-ओन्ड कारची माहितीही उपलब्ध होणार आहे. पंडित फार्म, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर येथे शनिवार (ता. 15) आणि रविवार (ता. 16) हा एक्‍स्पो होणार असून, स्मॉल कार्स, सेडान कार, हॅच बॅक कार, लक्‍झरी कार, एसयूव्ही, स्पोर्ट अशा कितीतरी गाड्यांची माहिती मिळणार आहे. त्यांच्या किमती आणि "ईएमआय'संबंधीच्या प्रश्‍नांची उत्तरे आपल्याला येथे मिळणार आहेत. दोन दिवस चालणारा हा एक्‍स्पो सकाळी 11 ते रात्री 7 या वेळेत सर्वांसाठी खुला आहे. 

काय : ऑटो एक्‍स्पो 2017 
कुठे : पंडित फार्मस्‌, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर 
कधी : 15 आणि 16 एप्रिल 
केव्हा : सकाळी 11 ते रात्री 7 
सुविधा ः प्रवेश व पार्किंग मोफत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com