प्रचारात बेकायदा रिक्षा जोरात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

पुणे - निवडणुकीच्या रिंगणात अकराशेहून अधिक उमेदवार असतानाही प्रचारासाठी केवळ पाचशे रिक्षांना परवानगी घेण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र त्याहून अधिक रिक्षांचा वापर होत आहे. एका उमेदवाराने एक रिक्षा वापरली, तरी अकराशेहून अधिक रिक्षांना परवानगी घेणे अपेक्षित होते. अशा वाहनांवर देखरेख करण्यासाठी आयोगाने निरीक्षक पथकांची नियुक्ती करूनही वाहनांचा बेकायदा वापर होत असल्याचे दिसते. 

निवडणुकीदरम्यान वाहनांचा वापर करण्यास आयोगाकडून मर्यादा घालण्यात आली आहे. त्यातही वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नोंदणी करून आरटीओची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. आरटीओ कार्यालयाकडून आजपर्यंत विविध प्रकारच्या 810 वाहनांसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यात 510 रिक्षांचा समावेश असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाने दिली आहे. 

अद्याप कारवाईच नाही 
प्रचारात विनापरवाना वाहनांचा वापर होतो का, यावर देखरेख करण्यासाठी आयोगाकडून चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात आरटीओ, पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाकडून अद्याप विनापरवाना वाहनांचा वापर होत असल्याबद्दल एकावरही कारवाई केली नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. 

प्रचारात वापरल्या जाणाऱ्या बेकायदा (परवानगी नसलेल्या) वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना पथकातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार काही वाहनांची परवानगी तपासण्यात येत आहे. 
- सतीश कुलकर्णी, निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिका 

पुणे

नवी सांगवी - पुणे जिल्हा माहेश्‍वरी प्रगती मंडल व सांगवी परिसर महेश मंडल आयोजित संपूर्ण भारतातील मारवाडी समाजाकरीता ‘तीज सत्तु...

05.09 PM

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत या वर्षी विविध सामाजिक...

02.15 PM

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या आठशे बस दीड वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे शहर आणि...

09.36 AM