भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस 38 लाख 60 हजार रुपयांचा निधी

प्रशांत चवरे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

भिगवण (पुणे) : पुणे जिल्हा परिषद व येथील भिगवण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथील भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी एकाच दिवशी सुमारे 38 लाख 60 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे जिल्हा परिषद व येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वर्गखोल्या व बंदीस्त गटार, संगणक, शालेय साहित्य व क्रिडा साहित्य आदी भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी मिळालेल्या निधीमुळे या शाळेचे रुपडे बदलण्यास मदत होणार असल्यामुळे पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

भिगवण (पुणे) : पुणे जिल्हा परिषद व येथील भिगवण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथील भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी एकाच दिवशी सुमारे 38 लाख 60 हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे जिल्हा परिषद व येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वर्गखोल्या व बंदीस्त गटार, संगणक, शालेय साहित्य व क्रिडा साहित्य आदी भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी मिळालेल्या निधीमुळे या शाळेचे रुपडे बदलण्यास मदत होणार असल्यामुळे पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

येथील भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 24 लाख 80 हजार रुपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या चार वर्गखोल्यांचे भुमिपुजन व येथील ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातुन शाळेस साहित्यांचे वाटप जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, सरपंच हेमाताई माडगे, उपसरपंच प्रदीप वाकसे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन बोगावत, रियाज शेख, अण्णासाहेब धवडे, धनाजी थोरात, गणेश राक्षे, वंदना शेलार, रेखाताई पाचांगणे, पिंटु गायकवाड, अजिंक्य माडगे, लालासाहेब धवडे, ग्रामविकास अधिकारी भिमराव भागवत उपस्थित होते.     

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने म्हणाले, शिक्षणाच्या माध्यमातुन खऱ्या अर्थाने समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडु शकते. येथील भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही तालुक्यातील सर्वाधिक पटांची शाळा आहे. शाळेतील पटसंख्या ही शाळेची गुणवत्ता दर्शविणारी आहे. भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी आवश्यक त्या भौतिक सुविधा देण्यासाठी निश्चित कटीबध्द आहे. सध्या चार वर्गखोल्यांच्या कामास निधी मंजुर करण्यात आला आहे. यापुढेही आवश्यक त्या भौतिक सुविधा देण्यासाठी निश्चित मदत करु. भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमाताई माडगे व ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून शाळेचा विकास, महिलांचे सबलीकरण तसेच गावाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले काम आदर्शवत आहे.

यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने चौदाव्या वित्त आयोगामधुन भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिगवण व भिगवण स्टेशन शाळेस 6 संगणक, 25 खुर्च्या, क्रि़डा साहित्य अंगणवाडीसाठी 328 शालेय गणवेश, 9 वजनकाटे, 9 लेवलपट्टया व खेळाचे साहित्य असे एकुण साडेतीन लाख रुपयांचे साहित्य भेट देण्यात आले. यावेळी हनुमंत बंडगर, संजय देहाडे, नानासाहेब दराडे, सचिन बोगावत, शंकरराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिलीप बनकर यांनी केले सुत्रसंचालन नवनाथ वणवे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक अंजना हेळकर यांनी मानले.

इंदापुर तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या भिगवण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भौतिक सुविधांची कमतरता होती. परंतु मंगळवारी (ता. 03) हा दिवस शाळेसाठी विक्रमी निधी मिळवुन देणारा ठरला. चार वर्गखोल्या बांधकामासाठी 24 लाख 80 हजार, बंदिस्त गटारासाठी 10 लाख, भिगवण ग्रामपंचातीकडुन 14व्या वित्त आयोगातुन 3 लाख 50 हजार तर श्री. माने यांचेकडुन पुस्तकांसाठी 10 हजार रुपये असा एकाच दिवशी शाळेस सुमारे 38 लाख 60 हजार रुपयांचा विक्रमी निधी मंजुर झाल्यामुळे आागामी शैक्षणिक वर्षापासुन शाळेमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध होतील. 

Web Title: bhigwan zp schools have 38 lacks 60 thousand rupees Funds