समाजातील पीडितांना आधार देण्याची गरज - मुक्ता टिळक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

बिबवेवाडी - ‘‘अण्णा भाऊंनी केलेले कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. समाजातील पीडितांना सध्या आधार देण्याची गरज आहे,’’ असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मानसी देशपांडे, सुनील कांबळे, राजेंद्र शिळीमकर, अनुसया चव्हाण, रूपाली धाडवे, प्रवीण चोरबोले, वर्षा साठे, महेश वाबळे, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त अविनाश सकपाळ, पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर आदी या वेळी उपस्थित होते. 

स्वामी विवेकानंद मार्गावरील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला महापौरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

सतीश सागर यांनी अण्णा भाऊंच्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली. बिबवेवाडी परिसरातील विविध संघटना, राजकीय पक्ष, संस्थांच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. अपर ओट्यावरील अण्णा भाऊ साठे ज्येष्ठ नागरिक संघाने या वेळी मिरवणूक काढली.