प्रभाग ‘कॅशलेस’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

पुणे - शहरातील प्रत्येक प्रभाग ‘कॅशलेस’ करण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने ठेवले असून, ंमंळवारपासून प्रभागनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यास सांगितले असून, इच्छुकांवर प्रभागात कॅशलेससाठीची यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

पुणे - शहरातील प्रत्येक प्रभाग ‘कॅशलेस’ करण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने ठेवले असून, ंमंळवारपासून प्रभागनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यास सांगितले असून, इच्छुकांवर प्रभागात कॅशलेससाठीची यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

प्रभागातील बॅंका, लहान-मोठे दुकानदार आणि स्वाइप मशिन पुरवणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे काम इच्छुकांनी करायचे आहे. नोटाबंदीमुळे काही प्रमाणात निर्माण झालेली गैरसोय दूर करण्यासाठी कॅशलेस व्यवहारांची संख्या वाढावी, या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने हा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या आठ दिवसांत प्रत्येक प्रभाग कॅशलेस करण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. त्यात लहान व्यावसायिकांनाही सहभागी करून घेण्यास सांगितले आहे. यासाठीची पहिली बैठक शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील सहा प्रभागांसाठी मंगळवारी घेतली. बैठकीत स्थानिक नगरसेवक, निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

दररोज दोन सभा
राज्य सरकारला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने पक्षाच्या वतीने सुराज्य पर्व सुरू केले असून, शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत दररोज दोन सभा घेण्यात येत आहेत. त्यातील पाच मतदारसंघांतील सभांचे काम पूर्ण झाले असून, कोथरूड, खडकवासला, वडगावशेरीमध्ये उद्यापासून सभा सुरू होणार आहेत, असे योगेश गोगावले यांनी सांगितले.

स्वाइप मशिन उपलब्ध करणार
प्रभागातील लहान-मोठ्या दुकानांची, व्यावसायिकांची यादी तयार करून सहा बॅंकांच्या मदतीने त्यांच्याकडे स्वाइप मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपाहारगृहांचाही त्यात समावेश करून घेण्यास सांगितले आहे.

पुणे

पुणे : पत्नी आई आणि वडीलांना सांभाळत नाही. घरात छोट्या मोठ्या कारणावरुन भांडत असते. याचा राग आल्यामुळे पत्नीचा तिच्या ओढणीने...

11.42 AM

अपघाताच्या धोक्याबरोबरच रहिवाशांचे आरोग्य धोक्यात- पाणी पुरवठा व स्थापत्य विभागाचा बेजबाबदारपणा. जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड...

08.33 AM

पुणे - शहरात उद्रेक झालेला डेंगी नियंत्रणात आणण्यासाठी आता घरोघरी जाऊन डासांचा नायनाट करण्यात येणार आहे. या मोहिमेची...

06.03 AM