मतदानापूर्वीच पुणेकरांचा भाजपला धक्का - बागवे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

पुणे - ""मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी न करून पुणेकरांनी भाजपला एक प्रकारचा धक्का दिला आहे. मतदानापूर्वीच दोन दिवस पुणेकरांनी त्यांचा कौल स्पष्ट केला आहे,'' असे मत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी रविवारी व्यक्त केला. 

पुणे - ""मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी न करून पुणेकरांनी भाजपला एक प्रकारचा धक्का दिला आहे. मतदानापूर्वीच दोन दिवस पुणेकरांनी त्यांचा कौल स्पष्ट केला आहे,'' असे मत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी रविवारी व्यक्त केला. 

प्रचाराचा समारोप होताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बागवे म्हणाले, ""कॉंग्रेसकडून 96 अधिकृत आणि नऊपुरस्कृत उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी केली आहे. त्यात काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतही होत आहे. मात्र, संपूर्ण शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी एकत्रित प्रचार केला. स्थानिक पातळीवर या एकत्र प्रचाराने आघाडी घेतल्याचे स्पष्ट दिसते. प्रदेश पातळीवर नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, रझा मुराद अशा नेत्यांच्या पुण्यात सभा झाल्या. देशातील घटनेच्या संरक्षणासाठी आणि पुण्याच्या विकासासाठी कॉंग्रेसला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.'' 

भाजपने 22 कोटी रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्या खर्चाचा खुलासा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. ते म्हणाले, ""अडीच वर्षांमध्ये भाजपने फक्त विकासाच्या गप्पा मारल्या. प्रत्यक्षात विकासासाठी कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. या सरकारने सामाजिक सलोखा नष्ट केला आहे. नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना स्वतःच्या कमाईचे पैसे काढण्यासाठी त्रास झालाच; पण त्या पेक्षाही तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. लाखो तरुण बेरोजगार झाले.'' 

निवडणूक प्रचारात पदयात्रा, कोपरा सभा, रॅली या माध्यमातून प्रचारावर भर देण्यात आला. शहरातील विकासाच्या शाश्‍वत विकासासाठी या निवडणुकीत कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

कॉंग्रेसचे नेते गोपाळ तिवारी म्हणाले, ""केंद्र सरकारची एकही योजनेची पुण्यात अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे केंद्रातील योजना पुण्यापर्यंत आणण्याच्या योजनेचा फोलपणा यातून सिद्ध होतो.''  या वेळी माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, रमेश अय्यर आदी उपस्थित होते. 

Web Title: BJP before voting shock - Bagawe