बोन्साय प्रदर्शनात दीडशे वर्षांचा वड!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

पुणे - फ्रेंड्‌स ऑफ बोन्साय, पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बोन्साय प्रदर्शनाचे आयोजन बोन्साय प्रेमींतर्फे करण्यात आले आहे. या प्रदर्शनातून लहान आकारात मोठे वृक्ष पाहण्याची अनोखी पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. येत्या शनिवारी (ता. २७) टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी १० वाजता प्रदर्शनाचे उद्‌घाटन आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ज्ञ रुडी नायोन यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष रुक्‍मिणी साठे व वैजयंती महाजन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

महाजन म्हणाल्या, ‘‘प्रदर्शनात या वर्षी प्रेम्ना-एक इंडोनेशियन वृक्ष, फायकस निया, इंडोनेशियन कॅज्युरीना, मिनिएचर वॅक्‍स मॅल्फीजिया हे नवीन जातींचे वृक्ष पाहता येणार आहेत. देशी वृक्ष प्रकारात चिकू, पेरू, आंबा, वड यांसारखी झाडे असणार आहेत. लोकमान्य टिळक यांच्या नातसून इंदूताई टिळक यांनी लावलेले १५० वर्षांचे वड हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहे. एकूण १५० हून अधिक वृक्ष प्रदर्शनात असणार आहेत.’’

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्र राज्यात सगळीकडे पाऊस बरसत आहे. दोन ते...

04.18 PM

पुणे : "मुस्लिमधर्मीय पुरुष कायद्याचा उपयोग स्वतःच्या सुखप्राप्तीसाठी करत असताना...

11.12 AM

मंचर : वाळद (ता. खेड) येथे सायली निलेश शिंदे (वय ७) या मुलीला घरात खेळत असताना सोमवारी (ता.१८) संध्याकाळी पाच वाजता सर्पदंश झाला...

08.54 AM