रेल्वेतून पडल्याने बालकाचा मृत्यू 

संदीप घिसे
बुधवार, 25 एप्रिल 2018

पिंपरी : धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे एका बालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.२५) सकाळी चिंचवड रेल्वे स्टेशन येथे घडली.

अर्जुन कृष्णा रमेशराव (वय १३, रा. शास्त्रीनगर डोंबिवली वेस्ट) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.

चिंचवड रेल्वे पोलिस चौकीचे पोलीस हवालदार संजय लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन हा इंद्रायणी एक्स्प्रेस या गाडीने डोंबिवलीहून सोलापूरला मामाच्या गावी मामासोबत चालला होता. मामा बोगीत बसलेले होते तर अर्जुन दरवाजात हवा खाण्यासाठी एकटाच उभा होता.

चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ वेगात असलेल्या रेल्वेने वळण घेतले असता तोल जाऊन तो खाली पडला. याबाबतची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्यास वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

अर्जुन याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतील मोबाइल क्रमांकावरून पोलिसांनी त्याच्या वडिलांशी संपर्क केला. त्यावेळी अर्जुन हा आपल्या मामासोबत इंद्रायणी एक्स्प्रेसने सोलापूर येथे गावी जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्जुन रेल्वेतून खाली पडल्याचे त्याच्या मामाला माहिती नव्हते. वडिलांनी याबाबत मामाला फोन करून सांगितले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार बी. ए. साबळे करत आहेत.

Web Title: Boy died after falling from moving train