#mynewspapervendor भाऊ झाला इंजिनिअर 

PNE18O60407.jpg
PNE18O60407.jpg

पुणे : "पिंपरी येथून वृत्तपत्रे घेऊन काळेवाडीत सायकलवर फिरून त्यांची विक्री करत असे. त्यावेळेस मला, वडिलांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकवीसशे रुपये दिले होते. माझ्या भावाने देखील घरोघरी वृत्तपत्रे टाकून बीई ची(इलेक्‍ट्रॉनिक्‍स) पदविका मिळविली'', अशा आठवणी वृत्तपत्र विक्रेते गोरख फुलसुंदर यांनी जागविल्या. 

कमल न्यूजपेपर एजन्सीचे मालक फुलसुंदर हे मूळचे नारायणगावचे. काही काळाने ते पुण्यात स्थायिक झाले. दहावीनंतरचे शिक्षण रखडल्यावर फुलसुंदर हे वृत्तपत्र विक्री व्यवसायाकडे वळाले. ते म्हणाले,""काळेवाडी येथे प्रवीण माने यांच्याकडे 1992 मध्ये वृत्तपत्रे विक्रीच्या कामाला सुरवात केली. नंतर पिंपळे सौदागर येथे काम सुरू केले. त्यासाठी मला माने तसेच विनय भावसार यांनी मोलाचे सहकार्य केले.

भावाचीही मला सुरवातीला व्यवसायात खूप मदत झाली. त्याने, वृत्तपत्रे टाकून बीई इलेक्‍ट्रॉनिक्‍सची पदविका मिळविली. कुटुंबीयांकडून मला नेहमीच पाठिंबा मिळाला. व्यवसायातील उत्पन्नावर तीन बहिणींची लग्नेही झाली. आता, व्यवसाय वाढला आहे. पत्नीचेही कामात मोलाचे सहकार्य मिळते.'' फुलसुंदर यांच्या हाताखाली आता 20 मुले काम करतात. त्यांच्याकडे विविध भाषेतील साडेतीन हजार वृत्तपत्रे, मासिके आणि पाक्षिके विक्रीस असतात. प्राधिकरण येथे ते वास्तव्यास आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com