लोणी: एक वर्षाच्या चिमुकलिचे अपहरण करुन खून

जनार्दन दांडगे
शनिवार, 16 जून 2018

लोणी काळभोर - आईची कुस ही लहान बाळासाठी सर्वात सुरक्षित जागा. मात्र कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील लोणी स्टेशन परीसरातील भरवस्तीत पुणे-सोलापुर महामार्गालगतच्या दुकानासमोर झोपलेल्या भिक्षेकरी महिलेच्या कुशीतुन एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन, तिच्यावर पाशवी बलात्काराबरोबरच तिचा खुन केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 14) मध्यरात्री घडली. विशेष बाब म्हणजे मुलीचे ज्या ठिकाणावरुन अपहरण झाली जागा व मुलाचा मृतदेङ आढळुन आला ती जागा भरवस्तीत व पुणे-सोलापुर रस्त्याच्या लगत आहेत.

लोणी काळभोर - आईची कुस ही लहान बाळासाठी सर्वात सुरक्षित जागा. मात्र कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील लोणी स्टेशन परीसरातील भरवस्तीत पुणे-सोलापुर महामार्गालगतच्या दुकानासमोर झोपलेल्या भिक्षेकरी महिलेच्या कुशीतुन एक वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन, तिच्यावर पाशवी बलात्काराबरोबरच तिचा खुन केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 14) मध्यरात्री घडली. विशेष बाब म्हणजे मुलीचे ज्या ठिकाणावरुन अपहरण झाली जागा व मुलाचा मृतदेङ आढळुन आला ती जागा भरवस्तीत व पुणे-सोलापुर रस्त्याच्या लगत आहेत. दोन्ही जागात केवळ शंभर फुटाचे अंतर असुनही, आरोपीने मुलीवर पाशवी बलात्कार करुन खुन करण्यापर्यत मजल मारली ही बाब अतीशय गंभीर बाब आहे. 

दरम्यान, हड्डी पप्प्या उर्फ मल्हारी हरीभाऊ बनसोडे (वय- 22, रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली) या त्या निर्दयी बलात्कारी तरुणाचे नाव असुन, गुन्हाची माहिती मिळाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी केवळ तिन तासाच्या आत सिसीटीव्ही फुटजेच्या आधारे लोणी काळभोर परीसरातीस रामदरा येथुन वरील आरोपीस ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान मल्हारी बनसोडे याने गुन्हा केल्याची कबुली दिली असुन, मयत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार मल्हारी बनसोडे याच्या विरोधात बाललैंगिक अत्यैचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलगी व तिचे नातेवाईक तमिळनाडु राज्यातील रहिवाशी असुन, मयत मुलगी, तिची आई, आजी व आनखी दोन महिला मागिल आठ दिवसापासुन ते लोणी स्टेशन परीसरात भिक मागुन उपजिवीका करीत आहेत. मयत मुलीबरोबरच आनथी एक तीन वर्षाची मुलगी व सहा वर्षाचा मुलगा असे एकत्रच रात्रीच्यावेळी फउटपाथवर झोपतात. पाच दिवसापुर्वी मयत मुलगी व तिचे नातेवाईक लोणी स्टेशन परीसरातील एका मंदीरात झोपले असतांना, एका दारु पिलेल्या व्यक्तीने मयत मुलीच्या आईच्या अंथरुनात शिरुन घृनास्पद कृत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी मयत मुलीच्या आईने प्रतिकार केल्याने केल्याने संबधित व्यक्ती पळुन गेल्याने पुढील अनर्थ टळला होता. त्यानंतर मयत मुलगी व तिच्या समवेत असलेल्या तीन महिलांनी एका खाजगी रुग्नालयच्या शेजारच्या दुकानाच्या ओट्यावर झोपण्यास सुरुवात केली होती. दरम्यान गुरुवारी (ता. 14) रात्री कपड्याचे दुकान बंद झाल्यावर नेहमीप्रमाने दहा वाजनेच्या सुमारास मयत मुलगीची आई व तिचे नातेवाईक दुकानासमोर बिछाना टाकुन झोपी गेले. त्यानंतर साडेअकरा वाजनेच्या सुमारास मुलीच्या आईला जाग आली असता, आपल्या कुशीत झोपलेली मुलगी नाहीशी झाल्याचे आढळुन आले. यावर मुलीचे आईने आपल्या समवेत झोपलेल्या नातेवाईकांना उठवुन मुलगी गायब बाब सांगितली. त्यानंतर लोणी स्टेशन परीसरात मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी आढळुन न आल्याने मुलीचा आई व आजीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जाऊन मुलगी गायब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. एक वर्षाची मुलगी झाल्याची गंभीर असल्याने, पोलिसांनीही रात्री अडीच वाजेपर्यत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हद्दीत ठिकठिकाणी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी आढळुन आली नाही. दरम्यान आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाच वाजनेच्या सुमारास मुलीचा आई नैसर्गिक विधीसाठी रस्त्याच्या दुसर्या बाजुला एसटी थांब्याच्या पाठीमागील बाजुस गेली असता, तिला तिची मुलगी विवस्त्र व मयत आढळुन आली. घाबरलेल्या मुलीच्या आईने ही बाब ओरडुन आपल्या नातेवाईकांना सांगितली. मुलीच्या आईची आरडीओरड एकुन मराठा महासंघाचे राकेश काळभोर यांनी ही बाब तातडीने पोलिसाना कळवली. यावर हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड, पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण व त्याच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पहानी केली. तर दुसरीकडे पोलिसांनी दुकानालगत असणाऱ्या प्यासा हॉटेलच्या सिसीटीव्ही फुटजेची पहानी करण्यास सुरुवात केली. या सिसीटीव्ही फुटजेज मध्ये सव्वा अकरा वाजनेच्या सुमारास एक इसम मुलीलसा उचलुन नेत असल्याचे दिसुन आले. सिसीटीव्ही फुटजेमधील व्यक्ती ही हड्डी पप्प्या असल्याचे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे पोलिस हवालदार चमऩ शेख यांच्या लक्षात येताच, पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना केला. दरम्यान हड्डी पप्प्या हा रामदरा परीसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने, त्यास सकाळी नऊ वाजनेच्या सुमारास ताब्यात घेतले. 

याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण म्हणाले, हड्डी पप्प्या उर्फ मल्हारी बनसोडे याने गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तर मागिल चार दिवसापुर्वी मंदीरात झोपलेल्या मयत मुलीची आईच्या अँथुरणात शिरलेला इसमही हाच असल्याचे आढळुन आले आहे. एक वर्षाच्या मुलीवर बलात्कार व तिचा खुन ही बाब अतिशय गंभीर घटना आहे. आ्ररोपीला अटक करण्यात आली असुन, पुढील तपास पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करीत आहेत.

Web Title: Butter: A year old kidnapped kidnapping