पुणे - पिंपळे गुरव येथे कर्करोग निदान शिबिर

मिलिंद संधान
शनिवार, 14 एप्रिल 2018

नवी सांगवी (पुणे) : ओम नमो परिवर्तन परिवार आणि लक्ष्य कर्करोग रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कँन्सर प्रबोधन व्याख्यानमाला व तपासणी शिबिराचे पिंपळे गुरव येथे नुकतेच संपन्न झाले. नटसम्राट निळु फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या मोफत शिबिरात दोनशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी स्त्रियांमधिल गर्भाशय - मुख कर्करोग व पुरूषांमधिल प्रोस्टेटचा कर्करोग या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पँप स्मिअर प्रोस्टेट कँन्सर टेस्ट आणि रक्त तपासणीही मोफत करण्यात आली.

डॉ वैशाली लोढा, डॉ शुभंकर कर्माकर, डॉ ज्ञानेश्वर उपासे, डॉ पवन लोढा व गौरी पंडीत यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ वैशाली लोढा यांना सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल लक्ष्य रूग्नालयाच्या वतीने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन ओम नमो परिवारातील आदिती वाघ, सोनल मुसळे, कविता कामथे व इतर सभासदांनी केले.

Web Title: Cancer diagnosis camp in pimple gurav pune