अतुल तापकीर यांच्या पत्नी व भावास पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

'ढोलताशे' या चित्रपटाला व्यावसायिक अपयश आल्यानंतर तापकीर आर्थिक विवंचनेत सापडले. या खडतर काळात साथ देण्याऐवजी पत्नी प्रियांकाने आपल्या भावांना मदतीला घेऊन आपला मानसिक छळ सुरु केला, अशी माहिती तापकीर यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली होती.

पुणे - फेसबुकवर सुसाइड नोट लिहून आत्महत्या करणारे सिनेनिर्माते अतुल तापकीर यांच्या पत्नी प्रियांका यांच्यासह त्यांच्या भावांना अटक केली असून, यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

अतुल यांनी आपण पत्नीच्या जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे फेसबुकवर लिहिले होते. घडल्या प्रकाराबाबत सर्वच स्तरातून संताप व नाराजी व्यक्त होत होती. घटनेचे गांभीर्य ओळखून डेक्कन पोलिसांनी तातडीने पावले उचलत पत्नी प्रियांका, तिचे दोन भाऊ कल्याण व बाळू गव्हाणे यांना तसेच प्रियांकाचा मावस भाऊ बापू थिगळे यांना मंंगळवारी अटक केली. त्यांना मंंगळवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

'ढोलताशे' या चित्रपटाला व्यावसायिक अपयश आल्यानंतर तापकीर आर्थिक विवंचनेत सापडले. या खडतर काळात साथ देण्याऐवजी पत्नी प्रियांकाने आपल्या भावांना मदतीला घेऊन आपला मानसिक छळ सुरु केला, अशी माहिती तापकीर यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली होती. या जाचाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याचे त्यांनी सांगून, डेक्कन येथील हाॅटेल प्रेसिडेंटमधील खोलीत विषप्राशन करुन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या या पोस्टनंतर प्रचंड खळबळ उडाली. या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: Case filed against Atul Tapkir's wife and 3 more