गुढीपाडवा साजरा करा स्वत:च्या घरात! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो 
कधी : 18 आणि 19 मार्च 2016 
कुठे : हॉटेल प्राइड, शिवाजीनगर, पुणे 
वेळ : सकाळी 11 ते रात्री 8 

पुणे - गुढीपाडवा स्वत:च्या घरात साजरा करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस जवळ आले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, शनिवारपासून सलग दोन दिवस म्हणजे 18 आणि 19 मार्च रोजी "सकाळ माध्यम समूहा'ने भव्य "सकाळ वास्तू एक्‍स्पो'चे आयोजन केले आहे. 

प्रत्येकाला स्वत:च्या हक्काच्या घरात राहायचे असते; पण कोणत्या ना कोणत्या अडचणींमुळे भाड्याच्या घरात राहावे लागते. अनेकांना ऑफिसपासून बऱ्याच अंतरावर राहण्याची तडजोड करावी लागते, तर काही जणांना मनपसंत घरात राहण्यासाठी वाट पाहत बसावे लागते; पण या सर्व प्रश्‍नांवर प्रभावी तोडगा म्हणून "सकाळ माध्यम समूहा'ने "वास्तू एक्‍स्पो'चे आयोजन केले आहे. यामध्ये परवडणाऱ्या घरांची मोठी शृंखला सादर करणार आहे. याशिवाय, लक्‍झ्युरियस घरांचीही माहिती मिळणार आहे. परवडणाऱ्या घरांपासून आलिशान घरापर्यंत सर्व काही, शिवाय घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ऍमेनिटीज्‌, लोकेशन, आसपासचा परिसर अशा सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरणार आहे. 

चाळीसहून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या 160 हून अधिक प्रकल्पांची माहिती येथे उपलब्ध होणार आहे. पुण्याच्या चौफेर उभे राहणारे प्रकल्प आणि पुण्याबाहेरील प्रकल्पांचीही सविस्तर माहिती इथे मिळणार आहे. शिवाय, रिअल इस्टेटशी निगडित होमलोनपासून फायनान्सपर्यंतच्या सर्व प्रश्‍नांबाबतच्या शंकांचे समाधानही करता येणार आहे. पुण्याभोवतीचे प्रकल्प, त्यांचे बजेट, कोणत्या प्रकल्पांमधून कोणत्या सुविधा मिळणार, कोणत्या ठिकाणी पैसे गुंतविणे जास्त फायद्याचे राहू शकते, तेथील परिसराचा विकास कसा होतो आहे, अशा विविध प्रश्‍नांसोबतच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्याला पाहता येणार आहेत. हॉटेल प्राइड, शिवाजीनगर येथे हा एक्‍स्पो होत आहे. तुमचे बजेट, इच्छा, आवड, सोय अशा प्रत्येक प्रश्‍नाचे योग्य उत्तर या एक्‍स्पोमधून मिळू शकते, त्यामुळे हा एक्‍स्पो तुमच्या मनातील घर पूर्ण करण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. 

सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो 
कधी : 18 आणि 19 मार्च 2016 
कुठे : हॉटेल प्राइड, शिवाजीनगर, पुणे 
वेळ : सकाळी 11 ते रात्री 8 

Web Title: celebrate Gudhipadva own home