Gaikwad
Gaikwad

हवेलीतील कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाडांचा राजीनामा

लोणी काळभोर (पुणे) : राजकीयदृष्ट्या अत्यंत संंवेदनशील असलेल्या पूर्व हवेलीमध्ये भारतीय जनता पक्षात मागील काही दिवसांपासून शांतता असल्याचे जाणवत असतानाच, पक्षाच्या कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पक्षात चांगलीच खळबळ उडाली आहे. केंद्रात व राज्यात सत्ता असुनही, पक्षाकडुन अथवा शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडुन ताकद मिळत नसल्याच्या कारणावरुन गायकवाड यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे पक्षाचा आणखी एक 'युवा" नेता शिरुर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्याने, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भारतीय जनता पक्षाला गळती सुरु होते की अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

चित्तरंजन गायकवाड यांनीही जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची कबुली दिली आहे. केंद्रात व राज्यात सत्ता असुनही, पक्षाकडुन अथवा आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याकडुन राजकीय ताकद अथवा विकास कामांच्यासाठी निधी मिळत नसल्याने पक्ष पदाचा राजीनामा दिल्याची कबुली दिली आहे. 

चित्तरंगन गायकवाड हे शिरुरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांचे खंदे समर्थक म्हणुन ओळखले जातात. पाच वर्षापुर्वी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना कंटाळुन गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन, पूर्व हवेलीत पक्ष संघटन मजबुत करण्यावर भर दिला होता. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत गायकवाड यांनी कदमवाकवस्ती येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करुन, पूर्व हवेलीत पक्षाची पाळेमुळे भरभक्कम करण्यावर भर देण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत पुर्व हवेलीत त्यांनी पाचर्णे यांना मदतीचा हात देतानाच, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायतीच्या राजकारणात आपले स्थान बळकट करण्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. दिड वर्षापुर्वी पार पडलेल्या जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत गायकवाड यांनी, पत्नी गौरी गायकवाड यांना जिल्हा परीषदेच्या कदमवाकवस्ती-फुरसुंगी गाटातुन पक्षाकडुन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र या निवडणुकीत गौरी गायकवाड यांना फार थोड्या मतांनी पराभाव पत्करावा लागला होता. मात्र तीन महिन्यापूर्वी कदमवाकवस्ती सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाबरोबरच, पक्षाचे पॅनेलही मोठ्या मताधिक्क्याने निवडुन आनले. सध्या कदमवाकवस्तीच्या सरपंचपदी त्यांच्या पत्नी गौरी गायकवाड विराजमान आहेत. 

राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार अशोक पवार यांना विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर, त्यांनी शांत न रहाता पुर्व हवेलीत स्वतःची व्होट बॅंक मजबुत करण्यावर भर दिला आहे. पवार यांनी जिल्हा परीषदेच्या उरुळी कांचन-सोरतापवाडी, लोणी काळभोर-थेऊर, कदमवाकवस्ती-फुरसुंगी तीनही गटात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडुन आनतानाच, आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्तांची मोठी मोर्चा बांधनी सुरु केली आहे. या उलट केचार वर्षापुर्वी केंद्रात सत्ता आल्याने, राज्यातही भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास, पदांच्या बरोबरच राजकीय ताकद मिळेल या आशेने पुर्व हवेलीतील अनेकांनी भाजपात प्रवेश केला. मात्र वर्षभरावर निवडणुका आल्या असतानाही अपवाद वगळता कोणालाही पद अथवा राजकीय काकद न मिळु न शकल्याने अनेक नेते स्वगृही परतण्याच्या तयारात आहेत. त्याची सुरुवात चित्तरंजन गायकवाड यांनी केल्याने पुर्व हवेलीत भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर आनखी एक युना नेता अशोक पवार यांच्याशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. 

याबाबत आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याशी संपर्क साधला असता, पाचर्णे म्हणाले, स्थानिक राजकीय वादातुन चित्तरंजन गायकवाड गायकवाड यांनी राजीनामा दिला असला तर राजीनामा स्वाकारलेला नाही. आहे. राजीनामा मागे घेण्याबाबत गायकवाड यांच्याशी चर्चा चालु असुन, त्यांची समजुत काढण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com