मतदारांच्या मनात ठसवणार उमेदवारांची स्वच्छ प्रतिमा

योगिराज प्रभुणे - @yogirajprabhune
शनिवार, 21 जानेवारी 2017

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसकडून वॉर रूम निवडणुकीसाठी सज्ज करण्याची तयारी वेगाने सुरू आहे. पक्षाच्या उमेदवारांची स्वच्छ प्रतिमा मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी सोशल मीडियासह प्रचाराच्या आधुनिक उपकरणांनी ही वॉर रूम सज्ज करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसकडून वॉर रूम निवडणुकीसाठी सज्ज करण्याची तयारी वेगाने सुरू आहे. पक्षाच्या उमेदवारांची स्वच्छ प्रतिमा मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी सोशल मीडियासह प्रचाराच्या आधुनिक उपकरणांनी ही वॉर रूम सज्ज करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा ११ जानेवारीला झाली. त्यानंतर आघाडीसाठी पक्षातील नेत्यांच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह असून, दुसऱ्या बाजूला पक्षाने निवडणुकीच्या वॉर रूमची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशासाठी केलेला त्याग आणि दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची वाक्‍ये, त्यांचा संदेश किंवा त्यांच्या भाषणातील एखादी छोटी क्‍लिपदेखील यात असेल. व्हिडिओ-ऑडिओमध्ये शहरातील विकासकामांना प्राधान्य देणार आहे. तसेच भविष्यातील पुण्याच्या विकासाची दिशाही यातून मतदारांपर्यंत पोचविण्यात येणार आहे. मेट्रोसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरवात काँग्रेसनेच केल्याचेही यातून अधोरेखित करण्यात येणार आहे. 

पक्षाकडून प्रचारात व्हॅट्‌सॲप आणि फेसबुकवरही भर देण्यात येणार आहे. सोशल मीडियावरील प्रचार हा थेट मतदारांपर्यंत पोचतो आणि तो त्यांना भिडतो. त्यामुळे हा प्रचार अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसते. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही या नव्या माध्यमाचा वापर पक्षाकडून केला जाणार आहे. फेसबुकवर अपलोड करण्यासाठी क्‍लिप तयार करण्यात येणार आहेत. तसेच काँग्रेसचे काम लोकांपर्यंत पोचविण्यासाठी व्हॅट्‌सॲप मेसेज करण्यात येतील. 

अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असलेल्या वॉर रूममध्ये पक्षाची निवडणुकीसाठीची व्यूहरचना निश्‍चित केली जाईल. त्या व्यूहरचनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक सर्व तांत्रिक मदत या वॉर रूममधून कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहे. 

पुणे

तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये असताना गंमत म्हणून वहीच्या कव्हरवरील अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर दाढी-मिशा काढल्या असतील! पण अशाच प्रकारचे...

04.48 AM

पुणे - ‘‘आजही मुलगी जन्मली, की महिलेलाच दोषी धरले जाते. स्त्री- पुरुष समानतेच्या बाता मारणारे लोकदेखील स्त्रियांना दुय्यम स्थान...

03.48 AM

पुणे - राज्यात येत्या शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाड्यात...

03.24 AM