बारामतीत स्वच्छतेसाठी तरुणाई रस्त्यावर! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

माळेगाव : बारामती नगरपालिका कर्मचाऱ्यांबरोबरच सामाजिक बांधीलकीतून शेकडो युवकांनी रविवारी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. शारदानगर, माळेगाव कॉलनी, कृषी महाविद्यालय चौक परिसरातील रस्ते त्यांनी चकाचक केले. 

माळेगाव : बारामती नगरपालिका कर्मचाऱ्यांबरोबरच सामाजिक बांधीलकीतून शेकडो युवकांनी रविवारी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. शारदानगर, माळेगाव कॉलनी, कृषी महाविद्यालय चौक परिसरातील रस्ते त्यांनी चकाचक केले. 
नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होऊन महिना उलटला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाळ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. असे असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते सचिन सातव, नगरसेवक सूरज सातव, नगरसेविका रूपाली गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी समाजोपयोगी कामाला सुरवात केली आहे. त्यात स्वच्छता मोहिमेला विशेष प्राधान्य दिले आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 10, 11, 18 मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी विशेषतः युवकांची फळी उभा केली आहे. या स्वच्छता मोहिमेत रस्ते, स्मशानभूमी, धार्मिक स्थळांना प्राधान्य दिले आहे. उर्वरित कुटुंबीयांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार माळेगाव कॉलनी, लक्ष्मीनगर, शारदानगर परिसरातील जवळपास शंभरहून अधिक गरजू व पात्र कुटुंबांना शासकीय योजनेतून शौचालय देण्यासाठी कार्यकर्त्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरून घेतले आहेत. 
येथील पाणीपुरवठ्याच्या योजनेला नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प जोडला जाणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत गटनेते सातव म्हणाले,""शहर व गावच्या परिवर्तनात युवकांचा सहभाग खूप महत्त्वाचा ठरतो. शारदानगर, माळेगाव कॉलनी परिसरातील लोकांना येथील युवकांनी स्वच्छतेचे महत्त्व रस्त्याची साफसफाई करून पटवून दिले. अर्थात ही चळवळ संपूर्ण शहरात पोचविण्यासाठी नगराध्यक्षांसह आम्ही पदाधिकारी यापुढे प्रयत्न करणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची मशिनरी पालिकेला मिळणार आहे.'' 
बारामतीत साफसफाई कामात युवकांचा मिळणारा हातभार आम्हाला प्रोत्साहनात्मक ठरत आहे, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या स्वच्छता विभागाचे प्रमुख सुभाष नारखेडे, उत्तम धोतरे यांनी दिली. 

माझा प्रभाग...स्वच्छ प्रभाग! 
""माझा प्रभाग...स्वच्छ प्रभाग ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी तरुण मंडळे व सामाजिक संस्था पुढे येत आहेत. मागील महिन्यात चार रविवारी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत काशीविश्‍वेश्‍वर तरुण मंडळ, शिवसमर्थ तरुण मंडळ, चांदणी चौक तरुण मंडळ (कसबा), श्रीमंत बाबूजी नाईक तरुण मंडळातील (सिद्धेश्वर गल्ली) युवकांनी श्रमदान केले. या मोहिमेला वर्षभर व्यापक स्वरूप देण्यासाठी तरुण मंडळांनी नगरसेवकांच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी पुढे यावे,'' असे आवाहन गटनेते सचिन सातव यांनी केले. 

पुणे

पुणे - ""आर्या जन्मली तेव्हा अनेकांनी मुलीला जन्म दिला म्हणून खूप काही ऐकवले. पण...

04.54 AM

पुणे - "मुलगी शिकली, प्रगती झाली...' ही शब्दावली सार्थ ठरवीत अनेक मुलींनी घर,...

03.54 AM

पुणे - मंडप नाही, कसला भपकेपणा नाही, कुण्या पुढाऱ्यांना निमंत्रण नाही, ना कोणाचे...

03.54 AM