‘सीएनजी’साठी रिक्षाचालक ‘गॅस’वर

आज तरी धंदा चांगला होईल. या आशेने सकाळी सात वाजताच घर सोडतो. मी घरी कमावणारा एकटाच. अन् खाणारी तोंडे पाच. आठ-दहा तास रिक्षा चालविल्यावर पाचशे-सातशे रुपयांशी गाठ पडते.
Rickshaw
RickshawSakal
Summary

आज तरी धंदा चांगला होईल. या आशेने सकाळी सात वाजताच घर सोडतो. मी घरी कमावणारा एकटाच. अन् खाणारी तोंडे पाच. आठ-दहा तास रिक्षा चालविल्यावर पाचशे-सातशे रुपयांशी गाठ पडते.

- प्रसाद कानडे

पुणे - आज तरी धंदा चांगला होईल. या आशेने सकाळी सात वाजताच घर सोडतो. मी घरी कमावणारा एकटाच. अन् खाणारी तोंडे पाच. आठ-दहा तास रिक्षा चालविल्यावर पाचशे-सातशे रुपयांशी गाठ पडते. धंद्यात खूप स्पर्धा आहे. सगळ्यांना परमीट दिल्याने रिक्षावाले वाढले, त्यात ओला, उबेरच्या टॅक्सी, रिक्षा. तरीही त्यांना तोंड देत रिक्षा व्यवसाय करतोय. सीएनजीच्या वाढणाऱ्या दराची चिंता तर आहेच, शिवाय लवकरात लवकर सीएनजी मिळण्यासाठीदेखील धडपड करावी लागते. सीएनजी भरण्यासाठी दररोज किमान एक ते दीड तास रांगेत थांबावे लागते. त्यामुळे रोजचे दोनशे ते तीनशे रुपयांचे आर्थिक नुकसान होते, असे रवी जाधव यांनी सांगितले.

जाधव हे ९० हजार रिक्षाचालकांचे प्रातिनिधिक उदाहरण आहे, ज्यांना आपला व्यवसाय सोडून रांगेत तासन् तास थांबावे लागते. पुण्यात वाढणारा प्रदूषणाचा स्तर लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या भुरेलाल समितीने अहवाल दिला. वाहनातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहने सीएनजीवर असणे आवश्यक असल्याचे सांगून रिक्षांना सीएनजी अनिवार्य करण्यात आले. त्यानुसार २००९ पासून पुण्यात सीएनजीची सुरुवात झाली. त्यावेळी पुलगेटजवळ एकच पंप होता. आता ही संख्या फारशी वाढली नाही. मात्र, त्या तुलनेत वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यावेळी सीएनजीच्या रांगेत पाच ते सहा तास थांबावे लागत होते.

१३ वर्षांत १५ पंप...

पुण्यात २००८-०९ मध्ये सीएनजी सुरू झाले. डिसेंबर २००९ अखेर ‘सीएनजी’वर धावणाऱ्या वाहनांची संख्या ४० हजार होती. त्या वेळी एक पंप होता. २०२२ मध्ये सीएनजी पंपाची संख्या अवघी १५ आहे, तर वाहनाची संख्या तीन लाखांच्या घरात आहे. १३ वर्षांत केवळ १५ पंप सुरू झाले.

पुण्याची स्थिती

  • सुमारे ३ लाख वाहने

  • १५ सीएनजी पंप

  • ६० पेट्रोल पंप

  • ९० हजार रिक्षा

  • ७ लाख किलो सीएनजी दररोजची विक्री

  • ५५० पुणे जिल्ह्यात पंप

  • ४ किलो सीएनजी टाकी क्षमता

  • ३० किमीचा प्रवास एका किलोमध्ये

  • ५० ते ७० किमी दररोजचा वापर

  • ७५ रुपये/किलो सध्याचा सीएनजी दर

  • पाचशे ते सातशे रुपये रिक्षाचालकांचे सरासरी उत्पन्न

रिक्षाचालकांना व्यवस्थेने बळीचा बकरा बनविला आहे. सीएनजीचा पुरवठा व्यवस्थित होईल, अशी यंत्रणा नाही. दररोज रिक्षाचालकांना तास ते दीड तास रांगेत थांबावे लागते. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानास व्यवस्था जबाबदार आहे.

- नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत, पुणे

तुमच्या अडचणी काय?

इंधनाचे वाढलेले दर, त्यात सीएनजीसाठी दररोज तासन् तास लावाव्या लागणाऱ्या रांगेमुळे तुम्हाला कसा आर्थिक फटका बसतो, यासंदर्भात तुम्हाला येणाऱ्या अडचणी आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आम्हाला कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com