नगरसेवक बागवेंसह १६ जणांना अटक

Crime
Crime

पुणे - विसर्जन मिरवणुकीतील ट्रॅक्‍टरचालक व साउंड सिस्टीम मालकास मारहाण करण्यासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना सोमवारी खडक पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी युवराज सुलतान अडसुळ (वय २७, रा. राजीव गांधी सोसायटी, कासेवाडी) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण करून मारहाण केल्याप्रकरणी बागवे यांच्यासह यासीर बागवे, विवेक ऊर्फ बंटी बागवे, दयानंद अडागळे, जयवंत मोहिते, सूरज कांबळे, कुमार अडागळे, नितीन कसबे, बापू कसबे, गणेश जाधव, अरुण गायकवाड, सुरेखा खंडाळे, विठ्ठल थोरात, परेश गुरव, सूरज कांबळे व शिवाजी काळे (सर्व रा. कासेवाडी, भवानीपेठ) यांना अटक करण्यात आली आहे. 
कासेवाडीतील अशोक मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक रविवारी बागवे यांच्या राजीव गांधी पतसंस्थेसमोरील रस्त्यावर आली. त्या वेळी बागवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देत ट्रॅक्‍टरचालक सोमनाथ म्हस्के व साउंड सिस्टीमचे मालक ओंकार कोळी यांना मारहाण करण्यास सांगितले, असा त्यांच्यावर आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com