नगरसेविका बारणे, ओव्हाळ  राष्ट्रवादीतून भाजपमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबायचे अजूनही नाव घेत नाही. माजी उपमहापौर आणि थेरगावच्या विद्यमान नगरसेविका झामाबाई बारणे आणि पुनावळेचे नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी सोमवारी (ता. ६) राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपची ताकद वाढली आहे.

महापालिकेतील १२८ पैकी विविध पक्षांच्या ४५ नगरसवेकांनी पक्ष बदलला. त्याचा सर्वांत मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला. राष्ट्रवादी पक्ष सोडून जाणाऱ्यांना रोखण्यासाठी स्वतः अजित पवार प्रयत्न करतात. मात्र त्यांनाही यश आले नाही. झामाबाई बारणे या आजवर दोन वेळा नगरसेविका झाल्या. या वेळी राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारली. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे कायम वर्चस्व असलेल्या थेरगाव परिसरातूनच त्यांनी राष्ट्रवादीची पताका कायम उंच ठेवली. त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सिद्धेश्‍वर बारणे यांनीही या वेळी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षांतर करणारे राष्ट्रवादीचे दुसरे नगरसेवक ओव्हाळ यांनी पुनावळे भागात आजवर राष्ट्रवादीची साथ केली होती. त्या परिसरातून आता भाजपची बाजू सावरण्याला मदत होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी दोन्ही नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले.

पुणे

पुणे : 'प्रत्येक प्रभागात योग केंद्र', 'ऍमिनिटी स्पेसचा सुयोग्य वापर', 'पारदर्शक, गतीमान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार', '...

02.12 PM

जुनी सांगवी - जुनी सांगवीतील पवनानदी घाटाजवळील स्मशानभुमीचे काम सध्या संथ गतीने होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरीकांना अंत्यविधी व...

11.27 AM

वारजे माळवाडी : येथील गिर्यारोहक पद्मेश पांडुरंग पाटील (वय 33) 15 ऑगस्ट रोजी लेह येथे गिर्यारोहण करताना दरीत पडला. त्याला...

09.18 AM