अपघात प्रकरणी 'कॉसमॉस'च्या अभ्यंकरांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

पुणे - भरधाव मोटारीची पाठीमागून धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. भांडारकर रस्त्यावर रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

पुणे - भरधाव मोटारीची पाठीमागून धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. भांडारकर रस्त्यावर रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

अरुंधती गिरीश हसबनीस (वय 27, रा. विलोचन रेसिडेन्सी, नऱ्हे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून मुकुंद लक्ष्मण अभ्यंकर (वय 70) यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटकही केली आहे. या प्रकरणी विक्रम सुशील धूत (वय 35, रा. इंद्रजित अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली. अभ्यंकर हे कॉसमॉस बॅंकेचे समूह अध्यक्ष आहेत. अरुंधती या पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये नोकरीस होत्या, तर त्यांचे पती एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करतात. त्यांना अडीच वर्षांचा ओजस नावाचा मुलगा आहे, अशी माहिती डेक्कन ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुचेता खोकले यांनी दिली. 

अपघातानंतर अभ्यंकर हे पळून जात होते. त्यांना आजूबाजूच्या नागरिकांनी पाठलाग करून पकडले. तसेच, जखमी अवस्थेतील हसबनीस यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुंधती या रविवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून भांडारकर रस्त्यावरून मैत्रिणीकडे जात होत्या. विधी महाविद्यालय रस्त्यावरून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक कॅफेजवळच्या गोपाळकृष्ण गोखले चौकाकडे जात होत्या. अरुंधती यांच्या दुचाकीमागे अभ्यंकर यांची मोटार होती व त्यात अभ्यंकर व त्यांची पत्नी बसली होते. अभ्यंकर हे मोटार भरधाव चालवत होते व त्याची धडक अरुंधती यांच्या वाहनाला बसली. बडोदा बॅंकेसमोर झालेल्या या अपघातात अरुंधती दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांनी घातलेले हेल्मेटसुद्धा तुटले. अपघातानंतर अभ्यंकर घटनास्थळावरून निघून जात असताना आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना पकडले. 

दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती कळवून कौस्तुभ अण्णाराव तांभाळे (वय 23, रा. नंदादीप अपार्टमेंट, पत्रकारनगर, गोखलेनगर) यांनी अरुंधती यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अभ्यंकर यांना ताब्यात घेतले. त्यांची मोटार आणि अपघातग्रस्त दुचाकी प्रभात पोलिस चौकीमध्ये आणली. अरुंधती यांच्या पतीला अपघाताची माहिती कळविली व अरुंधती यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला.

पुणे

पुणे - चिंब पावसात ग्रुपबरोबर फिरण्याची धमाल अनेकांना पावसाळी गिर्यारोहणाकडे नेते अन्‌ सुरू होतो गडकिल्ल्यांचा अनोखा प्रवास...

04.03 AM

पुणे - ‘‘सरकारी पातळीवर दोन देशांतील संबंधांसाठी, विकासासाठी विविध पातळींवर पावले उचलली जात असतातच. मात्र, समाजबदलासाठी...

04.03 AM

पुणे - तीन ते चार मीटर रुंदीचे पदपथ, दोन ते तीन मीटर रुंदीचे सायकल ट्रॅक, सेवा रस्ता आणि पादचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा...

03.48 AM