पुण्यात रंगणार नेत्यांच्या क्रिकेटचा थरार

‘सरकारनामा’च्या पीचवर आज-उद्या सामने
cricket tournament organized by Sarkarnama in pune politician play cricket in this tournament
cricket tournament organized by Sarkarnama in pune politician play cricket in this tournamentsakal

पुणे : ‘सरकारनामा’तर्फे आयोजित क्रिकेटनामा स्पर्धेचा फिव्हर वाढला असून येत्या शनिवारी आणि रविवारी (२८ - २९ मे) रोजी ही स्पर्धा पुण्यात रंगणार आहेत. राजकीय आखाड्यात एकमेकांवर कुरघोड्या करणारे दिग्गज राजकारणी मैदानावर एकमेकांसमोर येणार आहेत. ‘‘ या स्पर्धेत आमच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे हे गोपीचंद पडळकर यांची विकेट नक्की घेतील.’’ असा विश्‍वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. ‘‘ घोडामैदान जवळ आहे आताच हुरळून जाऊ नका.’’

असा इशारा भाजपचे नेते आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला. सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात या स्पर्धा थंड हवेची झुळूक ठरणार आहेत. पुण्यातील ‘सनीज वर्ल्ड’ येथे या स्पर्धा दोन दिवस रंगणार आहेत. ते या स्पर्धेचे व्हेन्यू पार्टनर आहेत. ‘क्रिकेटनामा’ स्पर्धेच्या निमित्ताने राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्यात अशाप्रकारचे सामने पहिल्यांदाच होत आहेत. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे आणि आप या राजकीय पक्षांसह प्रशासन आणि पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांचेह दोन संघ यात असतील.

यांचा सहभाग

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राज्यमंत्री विश्वजित कदम, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, अनिकेत तटकरे, महेश लांडगे, सुनील टिंगरे, संजय जगताप, संग्राम थोपटे आदी वरिष्ठ नेते मंडळी यात सहभागी होणार आहेत.

विजयाची घोडदौड कायम : जगताप

या स्पर्धेनिमित्त खेळाडूंच्या जर्सीचे आज अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात राजकीय नेत्यांची जुगलबंदी रंगली. प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याआधीच जिंकण्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी केला. ही स्पर्धा राष्ट्रवादी कॉंग्रेस जिंकणार असून या स्पर्धेपासून सुरू झालेली विजयाची घौडदौड महापालिका निवडणुकीपर्यंत कायम राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com