अमली पदार्थांचा अंमल!

अनिल सावळे - @AnilSawale
रविवार, 29 जानेवारी 2017

दोन महिन्यांमध्ये बारा तस्करांना अटक

पुणे - शहरात एकीकडे सायबर गुन्हेगारी वाढत असतानाच अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये वाढ होत आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या दोन महिन्यांत १२ तस्करांना अटक केली असून, पब्ज, हॉटेल्स आणि काही महाविद्यालयांच्या परिसरात ब्राउन शुगर आणि मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. 

दोन महिन्यांमध्ये बारा तस्करांना अटक

पुणे - शहरात एकीकडे सायबर गुन्हेगारी वाढत असतानाच अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये वाढ होत आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या दोन महिन्यांत १२ तस्करांना अटक केली असून, पब्ज, हॉटेल्स आणि काही महाविद्यालयांच्या परिसरात ब्राउन शुगर आणि मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. 

शहर जसे विस्तारत आहे तसे अमली पदार्थांच्या तस्करीतही वाढ होत आहे. मुंबई, गोवा आणि ठाणे परिसरातून शहरात अमली पदार्थांची तस्करी होत आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने डिसेंबरमध्ये पिंपरीत एका महिलेकडून ५० लाखांची एक किलो ब्राउन शुगर जप्त केली. समीरा शेख या तस्कर महिलेने मुंबई येथून ब्राउन शुगर आणली होती. कोणाला संशय येऊ नये, यासाठी तिने कडेवर मूल घेतले होते. तिने पिंपरीमध्ये आरती मिसाळ नावाच्या महिलेला ते पार्सल दिले. चौकशीदरम्यान तिला ड्रग्ज तस्करीसाठी केवळ दोन ते तीन हजार रुपये मिळत असल्याचे स्पष्ट झाले.

यापूर्वी दोनदा तिला पार्सलमध्ये नेमके काय आहे, हेही माहीत नव्हते. या घटनांवरून ड्रग्ज तस्करीत महिलांचा ‘सॉफ्ट टार्गेट’ म्हणून वापर होत असल्याचे दिसून येत आहे. अमली पदार्थविरोधी पथकाच्या प्रमुख प्रतिभा जोशी, पोलिस निरीक्षक स्वाती थोरात, सहायक निरीक्षक अजय वाघमारे, सुरेश साळी, पोलिस हवालदार राकेश गुजर, विनायक जाधव, विठ्ठल खिलारे, सचिन चंदन यांच्या पथकाने यापूर्वी जुलै महिन्यातही खडकी परिसरात अशीच कारवाई केली. आबेदा मांडेकर या ड्रग्ज डीलरकडून ८२ लाख रुपये किमतीची अडीच किलो ब्राउन शुगर जप्त करण्यात आली. आयबा शेख हा गेल्या दीड वर्षापासून अमली पदार्थविरोधी पथकाला हुलकावणी देत होता.

अखेर त्याला ६५ ग्रॅम चरस आणि मेफेड्रॉनसह नुकतीच अटक करण्यात आली. तसेच, सनी ऊर्फ दशरथ श्‍याम म्हेत्रे या तस्कराकडून पावणेआठ लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त केले. आयबा आणि सनी हे दोघे कॅम्पमधील एका महाविद्यालयातील मुलांना ड्रग्ज विकत होते. गेल्या काही दिवसांत झालेल्या पोलिस कारवाईवरून हिंजवडी, वानवडी, लष्कर, हडपसर, बंडगार्डन, सांगवी, खडकी आणि मुंढवा परिसरात ड्रग्ज तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.

दोन महिन्यांतील कारवाई
डिसेंबर २०१६
गुन्हा दाखल    अमली पदार्थ    जप्त माल 

पिंपरी    ब्राउन शुगर    ५० लाख रुपये (एक किलो)
हिंजवडी    गांजा    १४ हजार रुपये (९४० ग्रॅम)
वानवडी    मेफेड्रॉन    ४० हजार रुपये (आठ ग्रॅम)
लष्कर    मेफेड्रॉन    साडेचार लाख रुपये
आणि चरस     (६८ आणि २३ ग्रॅम)
हडपसर    गांजा    ९१ हजार रुपये (शंभर ग्रॅम)
हडपसर    गांजा    ९२ हजार रुपये (शंभर ग्रॅम)

जानेवारी २०१७
बंडगार्डन    मेफेड्रॉन    सव्वा लाख रुपये (२५ ग्रॅम)
बंडगार्डन    कोकेन    एक लाख १० हजार रुपये (११ ग्रॅम)
सांगवी    गांजा    १६ हजार रुपये (दोन किलो)
खडकी    गांजा    १४ हजार रुपये (९०० ग्रॅम)
मुंढवा    गांजा    १३ हजार रुपये (७२० ग्रॅम)

नोटाबंदी आणि पोलिसांची कारवाई, यामुळे ड्रग्ज तस्करीवर परिणाम दिसून येत आहे. पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी स्वत: गांभीर्याने लक्ष घातले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील ड्रग्जमाफियांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. 
- प्रतिभा जोशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थविरोधी पथक

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात श्रावणी बैलपोळ्यानिमित्त ठिकठिकाणी बैलांना सजवून त्यांची वाजत...

08.09 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) संगमनेर येथील गीता परिवार संचालित संस्कार बालभवनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मातीतून घडवू गणेश’...

04.00 PM

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के...

10.48 AM