अनधिकृत लोखंडी कमानीवर कारवाई

केशवनगर - लोणकर वस्ती येथील चौकातील अनधिकृत लोखंडी कमान काढताना कर्मचारी व अधिकारी.
केशवनगर - लोणकर वस्ती येथील चौकातील अनधिकृत लोखंडी कमान काढताना कर्मचारी व अधिकारी.

मुंढवा - केशवनगर येथील लोणकर वस्ती चौकात अनधिकृतपणे लावलेली लोखंडी कमान वाहतुकीस अडथळा ठरत होती. याबाबतचे वृत्त दै. सकाळमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण व आकाशचिन्ह विभागाकडून ती काढण्यात आली आहे. 

केशवनगर येथील लोखंडी कमान पूर्वी रस्त्यावर कोसळून पडली होती. त्यात सुदैवाने कोणालाही इजा झाली नव्हती. अतिक्रमण निरीक्षक श्रीकृष्ण सोनार व सहायक अतिक्रमण निरीक्षक दीपक ठोंबरे, आकाशचिन्ह विभागाचे परवाना निरीक्षक धनंजय भालेराव व शशिकांत देशमुख आदींनी ही कारवाई केली. तसेच मुंढवा चौक व केशवनगरमधील मांजरी रस्त्यावरील तब्बल चारशेहून अधिक अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com