अंगारकी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीला भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर
मंगळवार, 31 जुलै 2018

जुन्नर- अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र लेण्याद्री येथे आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभरात ऐशी हजाराहून अधिक भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. 

पहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष कैलास लोखंडे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी  शंकर ताम्हाणे, खजिनदार सदाशिव ताम्हाणे, विश्वस्त प्रभाकर जाधव, काशीनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते.  

श्री गिरिजात्मजकाच्या गाभारा व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी 6 वाजता व दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्टचे भाविकांना विविध सेवा पुरविण्यात आल्या. 

सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले. दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी सकाळी व सायंकाळी गर्दी केली होती. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जुन्नर परिसर व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली. 

Web Title: A crowd of devotees on the occasion of Angaraki Chaturthi